
ये ताई मला शिकव ना गं
पाढे एक दोन तीन चार,
गणित मग सोडवायला
मज्जाच मजा येईल फार.
पाच सहा सात आठ
करुन घे गं तोंडपाठ,
विचारले जर गुरुजींनी
म्हणेन मी गं पाठोपाठ.
नऊ दहा अकरा बारा
लिहून मला दाखव जरा,
गिरवत गिरवत शिकेन मी
अंकाचा हा सारा पसारा.
तेरा चौदा पंधरा
तेवढंच गं येतंय मला,
ताई, काम थोडं बाजूला सारून
पुढचे अंक शिकव ना मला !!
पाढे एक दोन तीन चार,
गणित मग सोडवायला
मज्जाच मजा येईल फार.
पाच सहा सात आठ
करुन घे गं तोंडपाठ,
विचारले जर गुरुजींनी
म्हणेन मी गं पाठोपाठ.
नऊ दहा अकरा बारा
लिहून मला दाखव जरा,
गिरवत गिरवत शिकेन मी
अंकाचा हा सारा पसारा.
तेरा चौदा पंधरा
तेवढंच गं येतंय मला,
ताई, काम थोडं बाजूला सारून
पुढचे अंक शिकव ना मला !!
-दशरथ (आण्णा) कांबळे
चंदगड, कोल्हापूर
0 टिप्पण्या