
चिंचा तू आणशील का?
आंबटगोड चिंचेची
चवच किती भारी,
डोळे मिचकावत
चिंचेची मजा घेऊ सारी.
चिंचेच्या नावानेच नुसते
माझ्या तोंडाला सुटते पाणी,
वेळ नको लावू दादा
विनविते रे तुला सोनी.
हवं तर माझा गल्ला फोडते
आणि तुला पैसे देते,
पण तू चिंचा आणून दे
तुझी कामं माझ्याकडून करून घे.
चिंचा मी खाईन
चिंचोके तुला देईन,
तू नाही खाल्लास...तर
मी ते भाजून खाईन...
चिंचेची आवड मला
आहे रे खूप,
कुणाला नाही देणार
मी खाईन रे गुपचूप.
-दशरथ कांबळे
चंदगड, कोल्हापूर
0 टिप्पण्या