
ससेभाऊ ससेभाऊ
कापसा सारखे मऊ मऊ
पडता पान ठोकता धूम
भित्रट कसे ससेभाऊ.
ससेभाऊ ससेभाऊ
गाजर तुम्हा आवडे फार
कान तुमचे लांब लांब
शेपूट तुमची झुपकेदार.
ससेभाऊ ससेभाऊ
चालता तुम्ही टुणटुण
पळता इकडून तिकडून
करी गवतासाठी भुणभुण.
कासवाशी पैज लावता
उड्या मारत दूर पळाला
गवत खाऊन झोपी गेला
कासव पैज जिंकून आला.
- सौ.रोहिणी अमोल पराडकर
कोल्हापूर
0 टिप्पण्या