
साधारण वीस वर्षांपूर्वी 'साहित्य मंडळ कराड' च्या त्रैमासिकात माझी "कोणे एके काळी" ही आयुष्यावर विनोदी भाष्य करणारी पहिली कथा प्रकाशित झाली. या कथेला रसिकांनी भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि या कथेने मला लेखिका म्हणून सामाजिक-साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात धाडसाने उभे केले. आपलं कुटुंब हेच जग मानणाऱ्या मला "अवघे विश्वची माझे घर" हा समृद्ध आणि विशाल दृष्टीकोन प्राप्त झाला. साहित्यातून, प्रबोधनातून समाजसेवा करण्याचा एक नवा पर्याय समोर आला. आणि मग हा मार्ग मी निश्चित करून वाटचाल चालू ठेवली.
ग्रामीण साहित्यिकांसाठी व्यासपीठ उभे राहिले. अनेक प्रतिभासंपन्न साहित्यिक या व्यासपीठावर उदयास आले. अनेकविध समाजहिताची कार्ये करता आली. आणि अनेक दादांची ताई आणि लेकरांची आई होता आले, हीच आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कमाई. या काळात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. मात्र चांगुलपणाने साथ कधीही साथ सोडली नाही त्यामुळे शत्रुसुध्दा मित्र बणले आणि कार्य अखंडित चालू राहिले.
मात्र या सर्वाची सुरूवात झाली ती साहित्य मंडळाच्या त्रैमासिकात प्रसिद्ध झालेल्या 'त्या' कथेने, ही सुखद आठवण मनाला सतत उभारी देत रहाते.
0 टिप्पण्या