ये आई, दादा, बाबा
किती विनवू तुम्हाला,
कंटाळा आला रे घरात
चला जाऊ फिरायला.
पायी पायी चालत जाऊ
एक एक मीटरचं अंतर ठेवू,
नियमांचे सारे पालन करुन
तोंडाला मास्क ही आपल्या लावू.
चल ना रे दादा
तू तरी माझ्या सोबत,
जास्त नको दूर जाऊ
लगेच येऊ बघ परत.
जीव नकोसा झालाय
घरात रोज बसून,
बोटं पण दुखताहेत माझी
नुसता मोबाईल वापरुन.
जाऊन येऊ चौकात
लगेच माघारी फिरु,
घरी आल्यावर मात्र
स्वत:ला सॅनिटायझर करु.
- दशरथ (आण्णा) कांबळे
चंदगड, कोल्हापूर
0 टिप्पण्या