
तुझ्या दाराहून जाता,
गुरगुरतय कुञं
कसं भेटायचं सखे,
माझं काळीज गं भिञं!
मोठं मोठ्याल्या डोळ्यांचा,
तुझा बाप ग जबर
कशी लागते कळेना,
माझ्या येण्याची खबर
मारकुड्या बैलावाणी,
कसा बघतो विचिञ
कसं भेटायचं सखे,
माझं काळीज गं भिञं.
तुझी गुबूगुबू काया,
माझी हाडं आली वरं
मी काढीन गं बैठका,
आणि मारीन गं जोरं
ये ना मिठीत तू माझ्या,
माझं मन गं पवित्र
कसं भेटायचं सखे,
माझं काळीज गं भिञं.
तुझा बाप पैलवान,
त्याच्या तालमीत गेलो
त्यानं धरली गं कुस्ती,
मीही पैलवान झालो
असं चोळलं मातीतं,
लुळं झालंय गं गात्र
कसं भेटायचं सखे,
माझं काळीज गं भिञं.
पाठीमागच्या दारानं,
तुझ्या घरातं शिरलो
तू चोर चोर म्हंटले,
तसा माघारी फिरलो
असा ठोकला धरूनं,
सारी कण्हलो मी रात्रं
कसं भेटायचं सखे,
माझं काळीज गं भिञं.
कुणी म्हणते उंडगा,
कुणी म्हणते ग वळू
वय निघून चालले,
सांग किती तळमळू
तुझी चर्चा गावभर,
माझी बदनामी मात्र
कसं भेटायचं सखे,
माझं काळीज गं भिञं.
पांदीकाठच्या झाडीत,
तुला घेतले उराशी
तू निसटली तिथून,
म्हणे टोचते रे मिशी
करू नको गं बहाणे,
माझे हसतात मिञं
कसं भेटायचं सखे,
माझं काळीज गं भिञं.
बाप तुझा गं कपटी,
त्याचं कपटी धोरण
त्याच्या डोळ्यात दिसतं,
माझं पेटतं सरण
त्याची शितोंडी फुटावी,
आणि बदलावं चित्र
कसं भेटायचं सखे,
माझं काळीज गं भिञं.
मी तुझा ग फाकड्या,
तुझं सारं माझ्यासाठी
तुझ्या दाराला लागावी,
माझ्या नावाचीच पाटी
तुझी बक्कळ दौलत,
यावी माझ्या हाती सूञं
कसं भेटायचं सखे,
माझं काळीज गं भिञं !!
-प्रमोद मोहिते, टाळगाव
ता.कराड जि.सातारा
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
0 टिप्पण्या