
वंशासाठी इथे । विपरीत घडे ॥
जीव तडफडे । पाहुनिया॥
भृणहत्या रोज । पोरीच्या गर्भाची॥
मायेला मायेची । पर्वा कुठे ॥
नरडीला नख । जन्मल्या बाळाच्या॥
घटना काळाच्या । गुपचूप...॥
मायेची ती ऊब । रक्ताची ती माया॥
गेली सारी वाया । वंशासाठी ॥
वंशाचा तो दिवा । ज्याला त्याला हवा॥
रोज इथे हेवा । सावित्रीचा ॥
काळजाची माया । काळजास हवी॥
रोज खेळी नवी । कशासाठी?॥
नीतिची मनात । करा हो लागण॥
बदला वागणं । माणसांनो!!
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
जीव तडफडे । पाहुनिया॥
भृणहत्या रोज । पोरीच्या गर्भाची॥
मायेला मायेची । पर्वा कुठे ॥
नरडीला नख । जन्मल्या बाळाच्या॥
घटना काळाच्या । गुपचूप...॥
मायेची ती ऊब । रक्ताची ती माया॥
गेली सारी वाया । वंशासाठी ॥
वंशाचा तो दिवा । ज्याला त्याला हवा॥
रोज इथे हेवा । सावित्रीचा ॥
काळजाची माया । काळजास हवी॥
रोज खेळी नवी । कशासाठी?॥
नीतिची मनात । करा हो लागण॥
बदला वागणं । माणसांनो!!
-प्रमोद मोहिते, टाळगाव
ता.कराड जि.सातारामो.नं. ९५ ६१ ७०० ८००
0 टिप्पण्या