माझं शिवार
माझं शिवार शिवारमाझ्या जीवाचं शिवार
जन्म गेला शिवारात
झालं जन्माचं शिवार.
सुगी चालली शेतात
माझं भरातं शिवार
माझी गावरान बोली
माझ्या बोलीतं शिवार.
घर माझं शिवारात
दारी शिवार शिवार
धोंड्या पांड्याची रं शाळा
माझं जिव्हार शिवार.
माय राबते रानातं
तिच्या घामाचं शिवार
ताटाताटाला झोंबतं
माझ्या मायेचं शिवार.
पाखरांच्या चोचीतून
माझं बोलतं शिवार
हिर्व्या पानांत पानांत
माझं डोलतं शिवार.
राघू-मैनेचं शिवार
गुराढोरांच शिवार
झिजणाऱ्या राबणाऱ्या
येड्या जिवांच शिवार.
देवा एकच मागतो
माझं मागणं शिवार
नको आणूस दुष्काळ
माझं जगणं शिवार!!
-प्रमोद मोहिते, टाळगाव
ता.कराड, जि.सातारा
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
ता.कराड, जि.सातारा
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
0 टिप्पण्या