
जागेल कधी ?
भल्या भल्या धरणांनीही
गाठला आहे तळ
नद्यांच्याही पायांमधलं
निघून गेलंय बळ.
जमिनीतल्या पाण्याची
आटून गेलीय सळसळ
खडकावर उरलेत आता
फक्त झऱ्याचे वळ.
झाडांनाही सोसवेना
उन्हाळ्याची झळ
जागेल कधी मानवा
तुझ्या मनातील कळ !!
- उमाकांत भेस्के
मो.नं. ९८५०६३०६७८
भल्या भल्या धरणांनीही
गाठला आहे तळ
नद्यांच्याही पायांमधलं
निघून गेलंय बळ.
जमिनीतल्या पाण्याची
आटून गेलीय सळसळ
खडकावर उरलेत आता
फक्त झऱ्याचे वळ.
झाडांनाही सोसवेना
उन्हाळ्याची झळ
जागेल कधी मानवा
तुझ्या मनातील कळ !!
- उमाकांत भेस्के
मो.नं. ९८५०६३०६७८
0 टिप्पण्या