Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

२९ मे रोजी पहिले आंतरराष्ट्रीय कवयित्रींचे मधुसिंधू काव्यसंमेलन

madhushri Kavysanmelan

• २९ मे रोजी ‘पहिले आंतरराष्ट्रीय कवयित्रींचे मधुसिंधू काव्यसंमेलन’ 

    ‘विश्व मधुसिंधू’ संस्थेतर्फे रविवार, दिनांक २९ मे २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजता पहिले ‘आंतरराष्ट्रीय निमंत्रित कवयित्रींचे ऑनलाईन मधुसिंधू काव्यसंमेलन’ आयोजित करण्यात येत असल्याचे ‘विश्व मधुसिंधू’ संस्थेच्या अध्यक्षा माधुरी काकडे यांनी कळविले आहे. सदर संमेलन हे पहिल्या विश्व काव्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी डॉ.मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन ‘अक्षरआनंद’ इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.योगेश जोशी यांच्या शुभहस्ते होणार आहे. 

    मधुसिंधू काव्य प्रकाराच्या प्रवर्तक कवयित्री माधुरी काकडे यांना याच सोहळ्यात वर्ल्ड लीटरेचर संस्थेतर्फे डॉ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते ‘आंतरराष्ट्रीय मधुसिंधू सुवर्णकमळ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

    या संमेलनासाठी भारतासह इंग्लंड, दुबई, जर्मनी, अमेरिका, सिंगापूर, मधील सुमारे २५ कवयित्रींना निमंत्रित करण्यात आले आहे. युवा आघाडीच्या कवयित्री प्रतिमा काळे आणि राजश्री मराठे या संमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत. डॉ.घाणेकर संपादित डहाळी विशेषांकही मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. 

    राष्ट्रपती पदक विजेत्या सहाय्यक पोलीस अधीक्षक मा. सुरेखा दुग्गे तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रतिभा झगडे, पुणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय मधुसिंधू काव्यगौरव, मधुसिंधू काव्य संवर्धन पुरस्कारांचे वितरण समारोपात करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या