पेरते व्हा ...
तू एक रिमझीमपावसाची सर...
तुझ्या मेघमल्हारात
तू दंगगुंग.
मी मात्र पिसा
एक व्याकूळ चातक
तुझा दिवाना.
पण सखये
तू ये किंवा न ये
तुझ्या मेघमल्हारास
मी पडसाद घालीन,
-मंत्रमुग्ध हळवी.
बेभान ओरडत राहीन
अखंड सराईतपणे
तुझ्याच प्रतीक्षेत
पेर्ते व्हा...पेर्ते व्हा...पेर्ते व्हा!
ता.कराड, जि.सातारा
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
0 टिप्पण्या