
तुला वाचत रहावसं वाटतं
सारखं...
चाळत रहावीशी वाटतात
तुझी पानं...
तुझे शब्दन् शब्द
वेचून घ्यावेसे वाटतात...
गुंतत रहावसं वाटतं
तुझ्या आशयात...
तुझी प्रतिमा... प्रतीकं...
उपमा... अलंकार...
गुणगुणत रहावेसे वाटतात...
तुझे वेलांटी... उकार ...
रफार... काना... मात्रा
सारेच आहेत ओळखीचे... परिचित...
तरीही,
मन काही भरत नाही,
कित्येकदा तुला वाचूनही...
खरेतर,
मी चांगल्या कवितेवर
जिवापाड प्रेम करतो
हे तुला माहीतच आहे...
- वसंत शिंदे, सातारा.
सारखं...
चाळत रहावीशी वाटतात
तुझी पानं...
तुझे शब्दन् शब्द
वेचून घ्यावेसे वाटतात...
गुंतत रहावसं वाटतं
तुझ्या आशयात...
तुझी प्रतिमा... प्रतीकं...
उपमा... अलंकार...
गुणगुणत रहावेसे वाटतात...
तुझे वेलांटी... उकार ...
रफार... काना... मात्रा
सारेच आहेत ओळखीचे... परिचित...
तरीही,
मन काही भरत नाही,
कित्येकदा तुला वाचूनही...
खरेतर,
मी चांगल्या कवितेवर
जिवापाड प्रेम करतो
हे तुला माहीतच आहे...
- वसंत शिंदे, सातारा.
0 टिप्पण्या