अबब! काय
किती मोठा हा हत्ती,
किती मोठा हा हत्ती,
बघतोय इकडे तिकडे
किती करतोय मस्ती.
मुसळासारखे पाय
सुपाएवढे कान,
लांब लचक सोंड
हलवितो मोठी मान.
शेपटी मात्र इवलीशी
दात त्याचे टोकदार,
चालतो कसा बघा
जसा निघाला हवालदार.
गर्जना त्याची मोठी
किती करतोय मस्ती.
मुसळासारखे पाय
सुपाएवढे कान,
लांब लचक सोंड
हलवितो मोठी मान.
शेपटी मात्र इवलीशी
दात त्याचे टोकदार,
चालतो कसा बघा
जसा निघाला हवालदार.
गर्जना त्याची मोठी
रुबाब त्याचा ऐटीत
घाबरतात त्याला सारे
पळतात बघा पट्टीत.
- दशरथ कांबळे
चंदगड, कोल्हापूर
घाबरतात त्याला सारे
पळतात बघा पट्टीत.
- दशरथ कांबळे
चंदगड, कोल्हापूर
0 टिप्पण्या