Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

नेहमीचे प्रश्न | FAQ | Frequently Asked Questions

FAQ, frequently asked questions

नेहमीचे प्रश्न

आमच्या वाचक व मान्यवर लेखक मंडळीकडून आम्हाला परिसस्पर्श.इन संबंधित वारंवार प्रश्न विचारले जातात त्यांच्या प्रश्नाचे निरसन होण्याच्या दृष्टीने वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची आम्ही येथे उत्तरे देण्याचे प्रयत्न करीत आहोत. जर आपल्या प्रश्नांची उत्तरे येथे उपलब्ध नसतील तर आम्हाला संपर्क साधा किंवा [email protected] वर आम्हाला ई मेल करा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न... (FAQ)

Parissparsh.in हे काय आहे?

उत्तर - www.parissparsh.in हे एक मराठी साहित्याचे संकेतस्थळ (वेबसाइट) आहे.

Parissparsh.in या संकेतस्थळावर मला काय वाचायला मिळेल?

उत्तर - www.parissparsh.in ह्या संकेतस्थळावर आपल्याला मराठी भाषेतील कविता, कथा, गझल, लेख, बालवाङ्मय, ईबुक्स व इतर मराठी साहित्य व त्या संबंधित माहिती वाचण्यास मिळेल. ज्यामुळे मराठी वाचकांना त्या माहितीचा नक्कीच लाभ मिळेल.

Parissparsh.in ची सामाजिक माध्यमे आहेत काय?

उत्तर – होय. परिसस्पर्श पब्लिकेशनची सामाजिक माध्यमे आहेत. ती आपल्याला या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर उपलब्ध होतील.

Parissparsh.in वर कोणत्या प्रकारचे साहित्य प्रकाशित केले जाते?

उत्तर - परिसस्पर्शद्वारे मराठी कविता, मराठी कथा, मराठी गझल, मराठी लेख, बालवाङ्मय, साहित्य वार्ता, मराठी साहित्य विषयक सर्व माहिती व त्या आनुषंगिक लेखन प्रकाशित केले जाते.

परिसस्पर्श वरील प्रकाशित साहित्य कोणत्या वयोगटासाठी उपलब्ध आहे?

उत्तर - परिसस्पर्श वरील सर्व साहित्य सर्वच वयोगटासाठी उपलब्ध आहे.

कोणत्या प्रकारचे साहित्य परिसस्पर्शवर प्रकाशित केले जात नाही?

उत्तर - इतर सामाजिक माध्यमावरील प्रकाशित असलेले साहित्य, इतर ब्लॉग्स/वेबसाइटवर प्रकाशित असलेले साहित्य, अशील स्वरूपाचा मजकूर असलेले साहित्य, समाजात वाद उत्पन्न करणारे साहित्य प्रकाशित केले जात नाही.

छापील स्वरुपातील साहित्य म्हणजेच पुस्तके, दिवाळी अंक, मासिके, नियंतकालिके, साप्ताहिके, वृत्तपत्रे वगैरे छापील माध्यमांतून प्रकाशित झालेले साहित्य प्रकाशित करता येईल का?

उत्तर - होय, परंतु पूर्व प्रकाशित साहित्य साइटवर प्रकाशित करण्यास लेखक, प्रकाशक, संपादक यांची सहमती असणे अनिवार्य आहे. जर त्याबाबत कोणाची तशी तक्रार आल्यास या साइटवर प्रकाशित झालेला तसा मजकूर हटविण्यात येईल.

Parissparsh.in वर साहित्य प्रकाशित कसे करावे किंवा त्याकरिता कोणाला संपर्क करावा?

उत्तर - परिसस्पर्श वर साहित्य प्रकाशित करण्यासाठी स्व: लिखित साहित्य ई मेल वर पाठवावे किंवा आम्हाला व्हॉट्सॲप नंबर ९५५१७०१८०१ वर पाठवावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या