आमच्या विषयी
"परिसस्पर्श" हे संकेतस्थळ मराठी भाषेच्या वैभवशाली साहित्य परंपरेला डिजिटल युगात नवे स्थान मिळवून देण्यासाठी निर्माण झाले आहे. छापील पुस्तकांच्या बरोबरीने मराठी लेखन इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहोचवणे ही काळाची गरज आहे, आणि हाच आमचा प्रयत्न आहे.
येथे दर्जेदार, निवडक आणि हृदयाला भिडणारे मराठी लेखन प्रकाशित केले जाते. कथा, कविता, गझला, नाटके, कादंबऱ्या, ललित लेख, वैचारिक लेख अशा विविध साहित्यप्रकारांद्वारे मराठी वाचकांना समृद्ध वाचनानुभव देण्याचा आमचा हेतू आहे.
मराठी साहित्यकार, कवी व लेखक यांना आपले स्वलिखित लेखन वाचकांसमोर मांडण्यासाठी "परिसस्पर्श" हे एक विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आपले मौलिक साहित्य आम्हाला पाठवा. आम्ही ते केवळ संकेतस्थळावरच नव्हे तर पुस्तक व ई-पुस्तक स्वरूपातही प्रकाशित करण्याची संधी देतो.
आमच्या मते साहित्य म्हणजे फक्त शब्दांचा संग्रह नसून समाजमनाला दिशा देणारी ऊर्जा आहे. म्हणूनच "परिसस्पर्श" या माध्यमातून आम्ही मराठी साहित्याचा दर्जा जपणे, नव्या लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि वाचकांना सातत्याने नवीन साहित्य पुरवणे हे ध्येय ठेवले आहे.
📱 व्हॉट्सअॅप – 9551701801
✉️ निरोप / संपर्क – येथे क्लिक करा