प्रेम असतं...
प्रेम असतं जगण्यासाठी
सुंदर जग बघण्यासाठी
उगीच राग मनात धरून
बळे बळे फुगण्यासाठी.
प्रेम असतं खोल खोल
काळजात असते ओल
आलीत जरी वादळे तरी
ढळत नाही कधीही तोल...
प्रेम असतं डोळ्यामध्ये
एकटक बघण्यासाठी
जग सारं झोपलं तरी
रात्रं रात्रं जागण्यासाठी
प्रेम असतं एकमेकांशी,
विश्वासाने वागण्यासाठी
कधीही न सुटणारी,
घट्ट मिठी मागण्यासाठी!!
-प्रमोद मोहिते, टाळगाव
ता.कराड, जि.सातारा
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
0 टिप्पण्या