एक महात्मा..!
तो....
निर्भीड अन् द्रष्टा
त्याचा व्यवस्थेविरुद्धचा हुंकार,
शिक्षणाच्या ज्ञानमंदिराच्या गाभाऱ्यातील
तो प्रकाशमान दीप .
त्याने कल्याणकारी समाजाचे
गायलेले एक पसायदान,
स्त्रीत्वाचे ज्वलनशील आयुष्यातील
प्रकाशबीज एक क्रांतीसुर्य.
त्याने ओढलेला जुलमी व्यवस्थेविरुद्ध आसूड,
काटेरी कुंपणात अडकलेल्या
शेतकऱ्यांच्या आयुष्यातील आशेचा दीपस्तंभ.
त्याने केलेल्या अस्पृश्यतेच्या व्यवस्थेचा धिक्कार,
तहानलेल्या कंठाणा विहिरीतून दिलेले अमृत
अन् भविष्याची भागलेली तहान.
सात जन्मांचे, सात वचनांचे व्रत निभावणारा
सावित्रीच्या सौभाग्याचं लेणं,
पावित्र्य, चारित्र्य अन् मांगल्याचा तो अमृतकुंभ.
- अक्षय जहागीरदार
🔖 Related Keywords
Marathi poem, Ek Mahatma poem, Akshay Jahagirdar poems, Inspirational poetry,
Marathi literature, Motivational poem in Marathi, Social reform poem, Equality and justice poetry,
Women empowerment poem, Tribute to Savitribai & social reformers,
मराठी कविता, एक महात्मा कविता, अक्षय जहागीरदार कविता, प्रेरणादायी कविता,
मराठी साहित्यातील कविता, सामाजिक सुधारक कविता, शिक्षणावर कविता,
स्त्रीसक्षमीकरण कविता, समानतेवरील कविता, महात्म्याला आदरांजली

0 टिप्पण्या