
मात्रावृते समजण्यासाठी मात्रा कशा मोजतात याची माहिती व त्याविषयी आभ्यास असणे खूप महत्वाचे असते. थोडक्यात कोणताही शब्द उच्चारताना लागणारा वेळ किंवा अवधी म्हणजेच मात्रा. मराठी भाषेमध्ये तीन मात्रांचे अक्षर नसते तसेच दीड किंवा अडीच मात्रे असणारेही अक्षर नसते. मराठीत एक किंवा दोन मात्रा असणारे अक्षर असते. गझलेत प्रत्येक ओळ उच्चारताना लागणारा कालावधी समान असतो कारण प्रत्येक ओळीत असणाऱ्या मात्रा समान असतात व त्यामुळे गझल गेय स्वरुपात असते व संगीतबद्ध करणे सोपे असते. गायकाला जसा गायनाचा रियाज करावा लगतो तसा गझल लेखन करताना गझलकाराला गझलेचे तंत्र समजून घेऊन सराव करावा लागतो व सरावाने गझल अधिक सोपी होत जाते व सरावानंतर मात्रा मोजत बसाव्या लागत नाहीत.
स्वर :- ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना 'स्वर' म्हणतात व स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात व स्वर उच्चारताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो.
मराठी भाषेत एकूण बारा स्वर आहेत ते खालीलप्रमाणे :-
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अ:
या बारा स्वरामध्ये अ, इ व उ हे तीनच स्वर एका मात्रेच आहेत व बाकीचे दोन मात्रेच आहेत. ज्या अक्षरात अ, इ व उ हे तीन स्वर अक्षरात सुट्टे आल्यास त्याची एक मात्रा होते व आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ: या प्रत्येक स्वराच्या दोन मात्रा होतात. एक मात्रा असणाऱ्या अक्षरांना लघू अक्षर म्हणतात व दोन मात्रांच्या अक्षरांना गुरू अक्षर असे म्हणतात. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ या दीर्घ उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांस किंवा का, की कू, के, कै, को, कौ, यांसारख्या स्वरयुक्त अक्षरांस ‘गुरु अक्षरे असे म्हणतात. लघू अक्षरांची एक मात्रा व गुरु अक्षराच्या दोन मात्रा मोजतात. लघू अक्षर (Uﬞ) अशा अर्धचंद्राकृतीने व गुरु अक्षर (-) अशा छोट्या आडव्या रेषेने दाखवितात.
काही निवडक मात्रावृत्ते :-
१ . समजाती :
अ] पद्मावर्तनी :
[१] वररमणी : ४२ मात्रा [८+८+८+८+८+२]
[२] तुंदिल : ३८ मात्रा [८+८+८+८+६]
[३] कपिवीर : ३६ मात्रा [८+८+८+८+४]
[४] वनहरिणी : ३२ मात्रा [८+८+८+८]
[५] हरिभगिनी / स्वरगंगा : ३० मात्रा [८+८+८+६]
[६] प्रियलोचना : २९ मात्रा [८+८+८+५]
[७] लवंगलता : २८ मात्रा [८+८+८+४]
[८] सूर्यकांत / समुदितमदना : २७ मात्रा [८+८+८+३]
[९] चंद्रकांत / पतितपावन : २६ मात्रा [८+८+८+२]
[१०] अनलज्वाला : २४ मात्रा [८+८+८]
[११] शुभगंगा : २२ मात्रा [८+८+६]
[१२] वर्षा : २१ मात्रा [८+८+५]
[१३] वंशमणि : २० मात्रा [८+८+४]
[१४] पादाकुलक : १६ मात्रा [८+८]
[१५] मुरजयी : १५ मात्रा [८+७]
[१६] बालानंद : १४ मात्रा [८+६]
[१७]शुद्धसती : १२ मात्रा [८+४]
[१८] पिशंग : १० मात्रा [८+२]
ब] भृंगावर्तनी :
[१९] सुखराशि : २८ मात्रा [६+६+६+६+४]
[२०] दासी : २४ मात्रा [६+६+६+६]
[२१] मदनरंग : २३ मात्रा [६+६+६+५]
[२२] परिलीना : २२ मात्रा [६+६+६+४]
[२३] धवलचंद्रिका : २० मात्रा [६+६+६+२]
[२४] जीवनलहरी : १२ मात्रा [६+६]
क] हरावर्तनी :
[२५] किंकिणी : २० मात्रा [गागाल गागाल गागाल गागाल]
[२६] अविनाशी : १९ मात्रा [गागाल गागाल गागाल गागा]
[२७] दंतरूचि : ३४ मात्रा [गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा गागा]
[२८] वरमंगला : २० मात्रा [गालगा गालगा गालगा गालगा गालगा]
[२९] सुरमंदिर : १० मात्रा [गालगा गालगा]
[३०] वीणावती : १८ मात्रा [गालगा गालगा गालगा लगा]
२. अर्धसमजाती
अ] पद्मावर्तनी :
[३१] कुसुमवल्ली : ५६ मात्रा [वंशमणि + कपीवीर]
[३२] मन्मथसुंदर : ६२ मात्रा [हरिभगिनी + वनहरिणी]
[३३] सदामंडिता : ४६ मात्रा [पादाकुलक+हरिभगिनी]
[३४] रत्नमाला : ५४ मात्रा [चंद्रकांत + लवंगलता]
[३५] रक्षा : ४० मात्रा [लवंगलता + शुध्दसती]
[३६] गगनचपला : ४० मात्रा [ शुध्दसती + लवंगलता]
[३७] रणरंग : ४३ मात्रा [पादाकुलक + समुदितमदना]
[३८] सत्किर्ती : ३८ मात्रा [समुदितमदना +८+३]
[३९] नंदनंदन : ३८ मात्रा [८+३+समुदितमदना]🔗🔗🔗
[४०] मूढा : ३६ मात्रा [पिशंग + चंद्रकांत]
[४१] श्रीमती : ४० मात्रा [पादाकुलक+अननज्वाला]
[४२] मुक्ताफलमाला : २२ मात्रा [शुध्दसती + पिशंग]
ब] भृंगावर्तनी :
[४३] महालोल : ४६ मात्रा [६+६+६+४+६+६+६+६]
[४४] प्रफुल्ल : ३४ मात्रा [६+६+६+५+६+५]
[४५] ह्रदयमोहना : २८ मात्रा [६+२+६+६+६+२]
क] हरावर्तनी :
[४६] मोहमाया : ३७ मात्रा [गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा गा