Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

कर्मयोगी व्हा | विजया पाटील, कराड

कर्मयोगी व्हा - मराठी लेख

जे जे आपल्याला हवं ते ते सहज साध्य झालं, तर आपल्याला कुठल्याच गोष्टींची किंमत कळणार नाही. याउलट कष्टाने मिळविलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद आपल्या अंतरंगी झालेली असते. आणि त्यासह मिळालेले आत्मिक समाधानही त्या कष्टाची सफलता असते.
      आज "इन्स्टंट, फास्टफूड आणि छप्पर फाडके" च्या जमान्यात आपण भौतिक सुखाच्या झुल्यावर दिवसरात्र झुलत असलो तरी शांती-सुखाच्या जादूची छडी मात्र खऱ्या कर्मयोग्याच्या हातात दिसते. ज्याला ध्येयाचा ध्यास आहे, ध्येयपूर्तीसाठी श्रमण्याची आस आहे, स्व:कर्तृत्वावर विश्वास आहे, जिद्दीला कृतीची जोड आहे, त्यालाच यशोदेवता प्रसन्न होते.
    झालंय काय की आपल्यापुढे आज प्रत्येक बाबतीत हजारो पर्याय निर्माण झालेत. हे करू की ते करू? हे निवडू की ते निवडू? हे योग्य की ते योग्य? अशा कन्फ्युजनमध्ये अडकल्याने आपण निष्क्रिय आणि अनिर्णयक्षम झालोय. स्वतःची ओळख पटलीय कुठे आपल्याला? मी कोण? माझ्या जगण्याचा उद्देश काय? मी आयुष्यात काय करू शकतो? हे प्रश्नच आम्हाला पडत नाहीत.यशाचा डोळे दिपवणारा प्रकाश आम्ही पाहतो. मात्र त्यामागची खडतर वाटचाल, अमर्याद श्रम आम्ही पहात नाही.
     यास्तव स्वतःशी प्रामाणिक राहून कार्यरत राहू तरच कर्मयोगी होऊ…हेच सत्य…!!

-विजया पाटील, कराड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या