
अक्षरगण वृत्त, वृत्त = आनंदकंद
लगावली = गागालगा लगागा गागालगा लगागा
आहे झरा कशाने डोळ्यात आटलेला
होता भुईस ज्याने पाऊस पाजलेला.
दुनियेस लागलेली विझवेल आग पाणी
वणवा कसा विझावा आगीस लागलेला.
संदेश येत नाही झाडास पाखरांचा
गेला थवा उडोनी आभाळ माखलेला.
सोडून काय द्यावे हाती कुणा धरावे ?
डोळ्यासमोर पारा निसटून चाललेला.
घेवू कसा सुखाने मी श्वास मोकळा हा
प्रत्येक श्वास आहे व्याजात कापलेला.
जोडू कशी मने ही टाचू कसे जिवाला
दिसतोय आज जो तो आतून फाटलेला.
सोसायचा अजूनी आहे किती उन्हाळा ?
माथ्यावरी कधीचा हा सूर्य थांबलेला.
गाणे कसे लिहावे शब्दात माणसाचे
हरएक शब्द आहे अर्ध्यात छाटलेला.
-वसंत शिंदे, सातारा.
मो.नं. ९९२२७७६०२७
लगावली = गागालगा लगागा गागालगा लगागा
आहे झरा कशाने डोळ्यात आटलेला
होता भुईस ज्याने पाऊस पाजलेला.
दुनियेस लागलेली विझवेल आग पाणी
वणवा कसा विझावा आगीस लागलेला.
संदेश येत नाही झाडास पाखरांचा
गेला थवा उडोनी आभाळ माखलेला.
सोडून काय द्यावे हाती कुणा धरावे ?
डोळ्यासमोर पारा निसटून चाललेला.
घेवू कसा सुखाने मी श्वास मोकळा हा
प्रत्येक श्वास आहे व्याजात कापलेला.
जोडू कशी मने ही टाचू कसे जिवाला
दिसतोय आज जो तो आतून फाटलेला.
सोसायचा अजूनी आहे किती उन्हाळा ?
माथ्यावरी कधीचा हा सूर्य थांबलेला.
गाणे कसे लिहावे शब्दात माणसाचे
हरएक शब्द आहे अर्ध्यात छाटलेला.
-वसंत शिंदे, सातारा.
मो.नं. ९९२२७७६०२७
0 टिप्पण्या