ये चल ना गं आई
मला बागेत घेऊन,
किती…तरी दिवस झाले
मला बागेत खेळून.
सुंदर सुंदर फुलांवर बसलेली
रंगीबेरंगी फुलपाखरे पाहीन,
सोबत खेळत बागडत त्यांच्या
मी ही फुलपाखरु होईन.
घेऊ दे ना आनंद मजला
मन मोकळा स्वछंद,
मोबाईलवर गेम्स खेळून माझे
डोळे झालेत गं मंद.
संध्याकाळी मोकळ्या हवेत भारी
जमतात गं माझे बाल सवंगडी,
कुणी लपाछपी कुणी कबड्डी
मज्जा मग येते खेळून लंगडी.
चल ना गं बागेत येऊ फिरुन
पाय थोडे मोकळे येऊ करुन,
तुला ही थोडं वाटेल बरं
बागेतल्या मोकळ्या हवेत जाऊन.
-दशरथ (आण्णा) कांबळे
चंदगड, कोल्हापूर
0 टिप्पण्या