
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगागा
भोवतीची वाटते सारी फिकी आरास आहे
शोधते आहे नजर ती नेमकी कोणास आहे.
फायदा होणार नाही तू नको ना पैज लावू
लावला आहे चुकीचा तू किती अदमास आहे.
जे कधी रात्रीस काळ्या आवसेच्या भ्यायले ना
चांदण्यांची आकळेना का भिती चोरास आहे.
खोल जो बुडला स्वतःच्या त्यास हे कळणार नाही
बोचणारी घोर चिंता आणखी कोणास आहे.
हालती डोळ्यात माझ्या या कुणाच्या स्वैर लाटा
हालचाली या तुझ्या की हा तुझा आभास आहे.
जिंदगी ही चालताना सोबती नाही जरी तू
पण तुझ्या त्या आठवांचा सोबती मधुमास आहे.
- वसंत शिंदे, सातारा.
मो.नं. ९९२२७७६०२७
मो.नं. ९९२२७७६०२७
0 टिप्पण्या