
ते पहा ढगोबा
आले काळेकुट्ट होऊन,
जाताना मात्र आम्हाला
गेले सारे भिजवून.
आले आले ढगोबा
ढोल ताशा बडवत,
जावे लागले आम्हाला
घरी चिखल तुडवत.
ढगोबा ढगोबा
तुला नाही कसं कळत?
हिवाळा, उन्हाळ्यातही
तू का येतोस नकळत?
रणरणत्या उन्हात तू
सूर्या आड येत जा,
पाऊस नको पाडू तू
छाया थोडी देत जा.
निरभ्र आकाशात तुझे
कापसासारखे ढग,
रंगीबेरंगी छटा तुझ्या
शोभून दिसतात बघ.
- दशरथ (आण्णा) कांबळे
चंदगड,कोल्हापूर
0 टिप्पण्या