Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

काळजाला जाळणे नाही बरे | मराठी गझल

kaljas jalane, Marathi Gazal, Vasant Shinde

        अक्षरगण वृत्त, वृत्त = मेनका
        लगावली = गालगागा गालगागा गालगा

        काळजाला जाळणे नाही बरे
        आतुनी भेगाळणे नाही बरे.

        सोडुनी द्यावे व्यथांना मोकळे
        वेदनांना पाळणे नाही बरे.

        वाचुनी उरणार मागे काय त्या
        आसवांना ढाळणे नाही बरे.

        सुरकुत्या दावेल नक्की तो तुला
        आरशाला भाळणे नाही बरे.

        फाटके लागेल हाती पान ते
        जीवनाला चाळणे नाही बरे.

        श्वासही जातील बघ हे सोडुनी
        सावलीला टाळणे नाही बरे.

        - वसंत शिंदे, सातारा.
        मो.नं. ९९२२७७६०२७

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या