Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

माणसं का जपायची..? - विजया पाटील, कराड

माणसं का जपायची..?  या विषयीचा विचार | Vijaya Patil Karad

जगासमोर आज नवनवीन आव्हाने उभी आहेत. विघ्नकर्ती माणसं विकृत विचारातून विध्वंसक कृती करत आहेत.मनामनात अविचार मूळ धरत असताना हे विकृत तृण मूळातून काढून टाकल्या शिवाय पर्याय उरलेला नाही. अशावेळी द्वेष-मत्सर-घृणेची रोपटी उगवूच नयेत यासाठी आपुलकी, स्नेहाचं बीजारोपण करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. कोण कुठं चुकतं? यावर चर्चा न करता चुकांची कारणं शोधणं आणि चुका रोखण्यासाठी योग्य विचार रूजविणं हे आपलं काम आहे.
        जनमानसातील त्रुटींवरील उपाय शोधणं आणि त्या त्रुटी समजूतीनं काढून टाकणं, त्याजागी सद्विचारांच्या वृक्षवल्लींचं रोपण करणं आणि त्याला सत्कर्माचं खतपाणी घालून वाढविणं, जतन करणं हे तर करायलाच हवं. अखेर माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे आपल्याला माणसं तर हवीतच…मात्र त्यांच्या माणूसपणासह…!
        म्हणूनच त्रुटी-विकृती संपवूया.. माणसं जपूया….!!

-विजया पाटील, कराड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या