
हलवत शेपटी
सूळ सूळ पोहतो,सुळसुळीत कातडी
टकमक पाहतो.
इवलेसे तोंड
कल्ले त्याला दोन,
पळतोय भारी
पकडील कोण?
भरती येता
मजा त्याला येई,
आनंदाने पोहत
उंच उड्या मारी.
बारीक डोळ्याची
नजर त्याची भारी,
चहुकडे ठेवी लक्ष
दुनिया त्याची न्यारी.
- दशरथ कांबळे
चंदगड,कोल्हापूर
0 टिप्पण्या