■ महाराष्ट्र साहित्य परिषद, जळगाव शाखेचे वाङ्मय पुरस्कार जाहीर
लेखक मनोहर सोनवणे यांच्या 'ब्रँड फॅक्टरी' या कथासंग्रहास प्राचार्य डॉ.किसनराव पाटील राज्यस्तरीय पुरस्कार रोख रक्कम रुपये ११,०००/- (अकरा हजार रुपये) व स्मृतिचिन्ह तसेच लेखक युवराज पवार मौजे कापूसवाडी, ता.जामनेर, जि.जळगाव यांच्या 'शिकार' या कथासंग्रहास खानदेशस्तरीय पुरस्कार रोख रक्कम रुपये ५,०००/- (पाच हजार रुपये) व स्मृतिचिन्ह जाहीर झाला आहे.
समीक्षक डॉ.म.सु.पगारे व कवी अशोक कोतवाल यांनी परीक्षण केले. लवकरच पुरस्कार वितरणासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषद, जळगाव शाखेतर्फे आयोजन करण्यात येणार आहे. असे महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शिरीष पाटील व कार्याध्यक्ष प्रा.डॉ. सत्यजित साळवे यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या