Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

नको नाराज होवू तू अरे हे व्हायचे होते | मराठी गझल

nako naraj hovoo, vasant shnde marathi gazal
    
    अक्षरगण वृत्त, वृत्त = वियदगंगा
    लगावली = लगागा गालगागा गालगागा गालगागा गा

    नको नाराज होवू तू अरे हे व्हायचे होते
    तुला सोडून आयुष्या निघूनी जायचे होते

    कळू नाही इरादा मी दिला केव्हाच दुःखांना
    व्यथांच्या सोबती गाणे मलाही गायचे होते

    कधीही मागणी नव्हती कुणी द्यावे मला काही
    ॠतूंना दान हातांचे खुल्या मागायचे होते

    जरी निष्ठूर दैवाने परीक्षा घेतली त्याची
    तरीही कातळावर फुल सुगंधी यायचे होते

    डहाळीने उरी जपला ॠतू हिरवा कितीही तो
    तरी झाडास पानाला सुक्या ढाळायचे होते

    पुसूनी टाकले मी चांदणे ते एवढ्यासाठी
    नभावर पावसाचे चित्र मज काढायचे होते

    - वसंत शिंदे , सातारा.
      मो.नं. ९९२२७७६०२७
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या