अक्षरगण वृत्त, वृत्त = मेनका
लगावली = गालगागा गालगागा गालगा
पाल चुकचुकते उराशी सारखी
चाटते जिभळ्या अधाशी सारखी.
हालतो आहे रिकामा पाळणा
बोलते दोरी कुणाशी सारखी.
केवढी आहे व्यथेला काळजी
राहते जागी उशाशी सारखी.
उंच जाण्याची किती घाई तिला
भांडते फांदी मुळाशी सारखी.
एक इच्छा कागदी आहे तरी
का अशी बुडते तळाशी सारखी.
माहिती आहे जरी जळणार ती
वात का खेळे जिवाशी सारखी.
- वसंत शिंदे , सातारा.
मो.नं. ९९२२७७६०२७
0 टिप्पण्या