
ये आई बघ ना गं..
ही सदाफुली रोजच फुलते,आपल्या अंगणाची शोभा
कशी रोजच वाढवते.
आपले ही जीवन
असेच ना गं असावे,
रोज रोज आपण ही
इतरांच्या मनी आनंद भरावे.
बघ किती गं ती सुंदर दिसते
सदाफुली आपल्या अंगणी खेळते,
अलगद हळूवार वाऱ्याची झुळूक
तिला कशी बघ हळूच डोलवते.
असो कोणताही महिना
ती रोजच नव्याने उमलते,
असेच जीवन आमचेही घडावे
हीच प्रार्थना मी श्री चरणी करते.
-दशरथ (आण्णा) कांबळे
चंदगड, कोल्हापूर
0 टिप्पण्या