राज्यस्तरीय मराठी कथा स्पर्धा | State level Marathi story competition | Marathi Katha Spardha
'साहित्य सहयोग' दीपावली व मासिक 'इंद्रधनुष्य' यांच्या संयुक्त्त विद्यमाने स्व.आ.डॉ.आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय मराठी कथा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कथा स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून प्रामुख्याने नवोदित कथाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती मा.सुनील इनामदार यांनी पत्रकाद्वारे दिली.
कथा स्पर्धेतील बक्षिसांचे स्वरूप खालीलप्रमाणे -
प्रथम क्रमांक- रक्कम रु.३०००/- मानपत्र व स्मृतिचिन्ह.
द्वितीय क्रमांक - रक्कम रु.२०००/- मानपत्र व स्मृतिचिन्ह.
तृतीय क्रमांक- रक्कम रु.१०००/- मानपत्र व स्मृतिचिन्ह.
उत्तेजनार्थ- एकूण ३ बक्षीसे रक्कम रु ५००/ मानपत्र व स्मृतिचिन्ह .
स्पर्धेचे नियम व अटी खालीलप्रमाणे -
१) लेखकांनी आपल्या कथा पोष्टाने किंवा ईमेलद्वारे (श्री लिपी/युनिकोड फॉन्टमध्ये) खाली दिलेल्या पत्यावर/ईमेल/लिंकवर मुदतीत पाठवाव्यात.
२) स्पर्धेसाठी कथा दिनांक १५ ऑगस्ट २०२२ पूर्वी पाठवाव्यात.
३) कथेसाठी विषयांचे बंधन नाही पण सामाजिक, वैज्ञानिक, ग्रामीण कथांना प्राधान्य दिले जाईल.
४) अश्लील किंवा वादग्रस्त कथा स्विकारल्या जाणार नाहीत.
५) परिक्षकांचा निकाल हा अंतीम निकाल राहील. विजेत्यांना निकाल कळविण्यात येईल तसेच निकाल वृत्तपत्रातही प्रकाशित करण्यात येईल.
कथा पाठविण्याचा पत्ता -
सुनील इनामदार,
साहित्य सहयोग दीपावली,
५४७४५, समतानगर,
मु.पो.शिरोळ, ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर, पिन: ४१६ १०२
संवाद- ९८५०२४७७६७.
Email Id- [email protected]
WhatsApp Link- येथे क्लिक करा/ link/button/#0ead09
0 टिप्पण्या