Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

प्राचार्य शिवाजीराव भोसले राज्यस्तरीय खुली ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

प्राचार्य शिवाजीराव भोसले, shivajirav Bhosale Spardha, vaktrutv Spardha

प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मतिथीनिमित्त राज्यस्तरीय खुली ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

🔸 स्पर्धेचे विषय :


१. वैखरीचे वारकरी, विचारांचे धारकरी-प्राचार्य शिवाजीराव भोसले
२. जगण्यासाठीचे युद्ध की जैविक युद्ध ?
३. स्त्रीवादाचे बदलते आयाम.
४. अन्यथा यादवी अटळ आहे ..!
५. जिंदगी नॉट आउट...
६. ब्रेकींगच्या गदारोळात पत्रकारितेची हत्या !
७. खरा तो एकची धर्म

🔸 स्पर्धेची पारितोषिके -

 प्रथम क्रमांक- ₹ ३००१+ प्रमाणपत्र
● द्वितीय क्रमांक- ₹ २००१ + प्रमाणपत्र
 तृतीय क्रमांक- ₹ १००१ + प्रमाणपत्र
 चतुर्थ क्रमांक- ₹ ५०१ + प्रमाणपत्र
पंचम क्रमांक- ₹ ५०१ +प्रमाणपत्र

🔸 सर्वात लोकप्रिय वक्त्यांची पारितोषिके -

 प्रथम क्रमांक (लोकप्रिय वक्ता) - ₹ २००० + प्रमाणपत्र
● द्वितीय क्रमांक (लोकप्रिय वक्ता) - ₹ १००० + प्रमाणपत्र
 तृतीय क्रमांक (लोकप्रिय वक्ता) - ₹ ५०० + प्रमाणपत्र 

🔸 स्पर्धेचे नियम -


१.प्रत्येक स्पर्धकाने आपला ५+१=६ मिनिटांचा व्हिडीओ १ जुलै पर्यंत संयोजकांकडे पाठवावा.
२.आपल्या वक्तृत्वाचा व्हिडीओ कोणत्याही प्रकारे एडिट केलेला नसावा व यापूर्वी तो कोठेही प्रसारित झालेला नसावा.
३.व्हिडीओ हा आडवा शुट केलेला असावा आणि आपला व्हिडीओ समाज माध्यमांवर (फक्त यू टयूब करण्यात येईल) प्रसारित करण्याचा हक्क संयोजकांकडे असेल, आपण सहभाग घेताय ह्याचा अर्थ, आपल्याला हरकत नसेल, कारण व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर कोणतीही सबब सांगू नये,ह्याची कृपया नोंद घ्यावी.
४. स्पर्धेसाठी वयाचे कोणतेही बंधन असणार नाही.
५.आक्षेपार्ह विधान अथवा भाषण करु नये. (जात, धर्म, पंथ, लिंग याबाबत अथवा राजकीय हेतूने अवास्तविक टिका करणारे विधान ज्यातून श्रोत्यांच्या भावना दुखावतील अशी वादग्रस्त विधाने करु नयेत.)
६.परीक्षकांच्या गुणांवर पारितोषिके दिली जातील (मोस्ट पॉप्युलर वगळता) आणि मोस्ट पॉप्युलर साठी देण्यात येणारी पारितोषिके ही व्हिडीओला मिळालेल्या व्हिव्ज आणि लाईक्सच्या आधारावर देण्यात येतील.
७.स्पर्धेतील कोणतेही पारितोषिक विभागून दिले जाणार नाही.
८.स्पर्धा ही नि:शुल्क असेल.
९.स्पर्धेच्या नियमात ऐनवेळी बदल करण्याचे हक्क संयोजकांकडे राखीव आहेत.
१०.परीक्षकांच्या निकालात आणि मोस्ट पॉप्युलर ह्या प्रकारामध्ये जर एखाद्या वक्त्यास पारितोषिक असेल तर त्यास दोन्ही प्रकारातील पारितोषिके दिली जातील.
११.व्हिडीओ ८७९६६०६१२७ ह्या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवावा, सोबत मराठीत संपूर्ण स्पर्धकाचे नाव, विषयाचे नाव आणि व्हिडिओच्या लघुप्रतिमा (Thumbnail) साठी स्पर्धकाने फोटो ( सेल्फी पाठवू नये) पाठवावा.

  अधिक माहितीसाठी संपर्क : 

-  श्रुती बोरस्ते : ९३०९५३२२५ 


🔸 खालील लिंकद्वारे ग्रुपला जॉईन व्हावे:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या