
सुट्टी एके सुट्टी
सुट्टीची मजा मोठी,
चला खेळू बागडू सारे
नाहीतर होईल खोटी.
चला खेळू बागडू सारे
नाहीतर होईल खोटी.
या रे या रे सारे या
खेळूया खो-खो लंगडी,
कबड्डीच्या खेळामध्ये
ओढुया धरुन तंगडी.
डोळे बांधून खेळू
पकडा-पकडी मैदानी,
खेळ खेळून झाल्यावर
मैदान साफ करु सर्वांनी.
सुट्टीतही खेळत शिकूया
व्यंजने आणि मुळाक्षरे,
पाढेही पाठ करुया
टाळ्या वाजवत सारे.
सुट्टीची ही मजा
आपण सारे लुटूया,
दिलेल्या अभ्यासाचीही
घरी उजळणी करुया.
- दशरथ कांबळे
चंदगड, कोल्हापूर
डोळे बांधून खेळू
पकडा-पकडी मैदानी,
खेळ खेळून झाल्यावर
मैदान साफ करु सर्वांनी.
सुट्टीतही खेळत शिकूया
व्यंजने आणि मुळाक्षरे,
पाढेही पाठ करुया
टाळ्या वाजवत सारे.
सुट्टीची ही मजा
आपण सारे लुटूया,
दिलेल्या अभ्यासाचीही
घरी उजळणी करुया.
- दशरथ कांबळे
चंदगड, कोल्हापूर
0 टिप्पण्या