लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा
तू किती पाण्यात आहे माहिती आहे मला
तू सुद्धा जात्यात आहे माहिती आहे मला.
तू कशाला दावतो हा फाटका माझा खिसा
जिंदगी गोत्यात आहे माहिती आहे मला.
तू अशी लाजू नको सांगताना बातमी
ती तुझ्या डोळ्यात आहे माहिती आहे मला.
आरशाचा दोष नाही हे मला सांगू नका
आज मी पाऱ्यात आहे माहिती आहे मला.
राहते झोळी रिकामी भिक्षुकाची नेहमी
भाकरी नाण्यात आहे माहिती आहे मला.
'मी कशी बापास सांगू या मनाची वेदना'
पोरगी कोड्यात आहे माहिती आहे मला.
बोलुनी नाहीच काही कायद्यावर फायदा
कायदा सौद्यात आहे माहिती आहे मला.
- वसंत शिंदे, सातारा.
मो.नं. ९९२२७७६०२७
आज मी पाऱ्यात आहे माहिती आहे मला.
राहते झोळी रिकामी भिक्षुकाची नेहमी
भाकरी नाण्यात आहे माहिती आहे मला.
'मी कशी बापास सांगू या मनाची वेदना'
पोरगी कोड्यात आहे माहिती आहे मला.
बोलुनी नाहीच काही कायद्यावर फायदा
कायदा सौद्यात आहे माहिती आहे मला.
- वसंत शिंदे, सातारा.
मो.नं. ९९२२७७६०२७
0 टिप्पण्या