
कवयित्री पूनम सुलाने कविरत्न पुरस्काराने सन्मानित
प्रसिद्ध कवयित्री पूनम सुलाने यांना विक्रमशिला हिंदी विद्यापीठ, गांधीनगर, भागलपूर (बिहार) यांच्यातर्फे कविरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पूनम सुलाने या जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद मधील गोकुळवाडी या छोट्याशा खेडेगावातील असून त्या सध्या नोकरीच्या निमित्ताने हैद्राबाद येथे स्थायिक झाल्या आहेत. हिंदी भाषेचा कविरत्न पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सुलाने यांचे दोन पुस्तके प्रकाशित असून विविध हिंदी व मराठी भाषेतील विविध राज्यातील नामांकित वर्तमानपत्रातून त्या नेहमीच लेखन करत असतात. तसेच सहलेखक म्हणून त्या वेगवेगळ्या राज्यात ओळखल्या जातात व त्यांची अनेक पुस्तके देखील प्रकाशित आहेत.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल जेष्ठ कवयित्री जयश्री औताडे, ग्रामीण साहित्यिक बाबा चन्ने, यांच्यासह 'न्याय देणारा संवाद' या साहित्य समूहाच्या सदस्या तथा आकाशवाणी धुळे केंद्राच्या निवेदिका पूनम बेडसे, रोहिदास होले, संगिता महिरे साळवे, सरला मोते, जयाबाई मुंडे, डाॅ.वैष्णवी मनगटे, डाॅ.स्नेहा कोळगे, रेखा बागुल, कावेरी गायके, पल्लवी पवार, वर्षा शिदोरे, सरिता भांड, करिष्मा डोंगरे यांनी सुलाने यांच्या भावी साहित्य वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या