Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

काळीज जळताना | निखील सुक्रे,परभणी

Kalij Jaltana, marathi kavita, nikhil Sukre

        श्रध्दांजली वाहताना हात थरथरले 
        मृत्यूला घाबरतो मी तेव्हा खरे कळले.

        आपल्यांची साथ असते काम होईस्तोर
        हे जुने शब्द, नव्याने तेव्हा खरे कळले.

        सख्या नात्यांनीच जेव्हा टाळले मजला
        मायाळू आईचे महत्त्व तेंव्हा खरे कळले.

        तिने टाळले मजला चौकात अन् रस्त्यावर
        प्रेम आहेच माझ्यावर हे वळणावर खरे कळले. 

        मार मजला विषारी राजकारण्या तू 
        हात जोडून लुटण्याचे तुझे हेतू खरे कळले. 

        तिच्या घराची बाल्कनी जेव्हा बोलते मजला 
        सवय ही बेकार आहे तेंव्हा खरे कळले.

        उतरला तिरंगा जेंव्हा लाल किल्ल्यावर
        रक्त माझे गोठलेले तेंव्हा खरे सळसळले.

        जरी पाहिली कागदी नोटात 
लक्ष्मी तुम्ही 
        आई माझी दौलत तेव्हा खरे कळले !!

        - निखील नामदेवराव सुक्रे, परभणी



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या