प्रेम म्हणजे
आपल्याच मनातलं
एक
मोरपिस,
प्रेम म्हणजे
मीरेच्या ओठातलं
घोटभर
विष.
प्रेम म्हणजे
भावनेच्या काठावरली
गुलाबी
जाग,
प्रेम म्हणजे
आतुरल्या डोळ्यांतली
मोरपिसांची
बाग...
प्रेम म्हणजे
मयूरासारखं
बेधुंदपणे
नाचणं,
प्रेम म्हणजे
लांडोर होऊन
अलगद
थेंब वेचणं.
प्रेम म्हणजे
डोळ्यातल्या अश्रुंना
मोकळी झालेली
वाट,
प्रेम म्हणजे
दोन जिवांच्या
आयुष्यातली
रम्य पहाट!
-प्रमोद मोहिते,टाळगाव
ता.कराड जि.सातारा
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
0 टिप्पण्या