शब्दवेली साहित्य मंच राज्यस्तरीय काव्यस्पर्धा, २०२१
शब्दवेली साहित्य मंच या समूहाची निर्मिती रोहिदास होले आणि संगिता महिरे-साळवे यांनी दिनांक २५ एप्रिल २०१७ रोजी सर्व साहित्यिकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशाने केली आहे. या संस्थेमार्फत नेहमी स्तुत्य उपक्रम राबविले जातात. प्रामाणिक आणि निर्मळ हेतूने साहित्यसेवा या समूहामार्फत आजतागायत चालू आहे. या समूहामार्फत नुकतीच एक राजस्तरीय काव्यस्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये राज्यातील तब्बल १२१ स्पर्धक सहभागी झाले होते. नव्याने लिहणाऱ्या युवा साहित्यिकांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या साहित्याला व्यासपीठ मिळावं आणि स्पर्धेच्या माध्यमातून नवीन काही शिकता यावं यासाठी हा समूह नेहमी प्रयत्नशील असतो व त्याचाच एक भाग म्हणजे या स्पर्धेचे आयोजन होय. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक मा. प्रशांत वाघ [पँसिपिक टायगर] लाभले व त्यांनी चोख कामगिरी बजावली आहे.
विजेत्या स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे
● सर्वोत्कृष्ट- सौ.सुनिता घुले
● प्रथम- पंडित शंकर गायकवाड , मनिषा नंदाने, रामहरी सोपान वरकले
● द्वितीय- मलेका शेख सय्यद, शेख वाय. के., सुवर्णलता गायकवाड
● तृतीय- राजेश नागुलवार, श्रीमती मंगला श्यामकांत खंडागळे, हेमा जाधव
● उत्तेजनार्थ- ऋतुजा गायकवाड , निखील मोहिते, पुनम सुलाने, सुधाकर नथू भामरे, सौ.श्रद्धा राऊत बुरले
● लक्षवेधी- दिलशाद यासीन सय्यद, प्रभाकर दहापुते, सुभाष मानवटकर, सौ.सीमा पानसरे, सौ.माधुरी शेवाळे पाटील.
0 टिप्पण्या