Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

गुलाबी पाकळ्या | मराठी गझल | वैभव चौगुले

गुलाबी पाकळ्या, वैभव चौगुले, Gulabi Paklya, मराठी गझल,

        वृत : वियदगंगा
        लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा

        तुला भेटायची बंदी मला बोलायची बंदी
        कशी शोधायची आपण अता अनमोल ती संधी.

        फुलांनी सोडताना प्राण अश्रू ढाळतो कोणी
        कशी असते उमलण्याची कळ्यांना वेगळी धुंदी.

        निघाला आपले तो दैव लिहणारा कसा जुल्मी
        इथे नशिबीच प्रेमाची कशी रे आपल्या मंदी.

        दिला होकार तू मी घातल्यावर साद एकांती
        कसा झालोय मी नादीक अन् बनलो तुझा छंदी.

        गुलाबी पाकळ्या हसुनी उधळले जीवनावर तू
        तसे जीवन सुखाला स्वाद आला छान गुलकंदी.

        - वैभव चौगुले, सांगली
        ९९ २३ १० २६ ६४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या