माय
माय माझी माय
जशी दुधावरची साय
तिच्या सारखी मायाळू
साऱ्या दुनियेत नाय ॥धृ॥
केला हाताचा पाळणा
तिनं जोजविलं मला
झेलुनिया दु:ख सारं
तिनं वाढविलं मला
तिच्या लेकराच्यासाठी,
तिच्या सारखी मायाळू
साऱ्या दुनियेत नाय ॥धृ॥
केला हाताचा पाळणा
तिनं जोजविलं मला
झेलुनिया दु:ख सारं
तिनं वाढविलं मला
तिच्या लेकराच्यासाठी,
झाली वासराची गाय ॥१॥
तिच्या फाटक्या साडीला
जरी सतरा या गाठी
तरी नवं नवं लेणं
तिच्या लाडक्याच्यासाठी
नाही हलकं-फुलकं
तिच्या फाटक्या साडीला
जरी सतरा या गाठी
तरी नवं नवं लेणं
तिच्या लाडक्याच्यासाठी
नाही हलकं-फुलकं
आहे सूट-बूट-टॉय ॥२॥
तळहाताच्या फोडास
तिनं जपलं उराशी
राबराबली शेतात
कधी राहून उपाशी
लढा दिला जिंदगीशी,
तळहाताच्या फोडास
तिनं जपलं उराशी
राबराबली शेतात
कधी राहून उपाशी
लढा दिला जिंदगीशी,
कधी हरली ती नाय ॥३॥
तिची सेवा घडो देवा
दे रे हेच एक दान
तिच्या पायाशी पंढरी
नाही दुजे तीर्थस्थान
होई जन्माचं सार्थक
तिची सेवा घडो देवा
दे रे हेच एक दान
तिच्या पायाशी पंढरी
नाही दुजे तीर्थस्थान
होई जन्माचं सार्थक
तिचे धरीता मी पाय ॥४॥
- रोशनकुमार पिलेवान, पिंपळगाव
ता.ब्रह्मपूरी, जि.चंद्रपूर
0 टिप्पण्या