Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

पुन्हा एकदा होते पहाट | प्रेम कविता | प्रमोद मोहिते

punha ekhada hote pahat, प्रमोद मोहिते

        पुन्हा एकदा होते पहाट

        जुनं घरटं सोडून चिमणी उडून गेलीय...
        तेव्हापासून माझं मन उजाड माळरान झालंय
        त्या कैफातच ते वळण मनातून निखळतय्
        नि ग्रहण लागलेय गहन आसवांचे
        नजरेतल्या प्रीतज्योतींना!
        पण आठवांचे कंद अजून दरवळतात
        मनातल्या ऋतूऋतूतून स्थितीगतीत!

        झिमझीम आठवणीच्या पावसात भिजावं
        भूतकाळास थोडं गुरफटून पहावं
        दिसतात ते धुंद दिवस
        कापरासारखे वितळलेले...

        एखाद्या उत्तररात्री झुकू लागते मनात
        ती विरहाची चांदणी... वळणावरची...
        अन् पुन्हा एकदा होते पहाट
        आठवणींची.
        कंठातल्या हुंदक्यांची... आठवांत चिंबचिंब
        डोळा मिटल्या पापणीत फक्त तिचं प्रतिबिंब!!


        -प्रमोद मोहिते, टाळगाव
        ता.कराड, जि.सातारा
        मो.नं. ९५ ६१ ७०० ८००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या