शब्द चेतना शब्द साधना शब्द माझी प्रीत
रसिका तुजसाठी लिहतो मी शब्दांचे गीत.
गीत माझे शब्द हळवे शब्दांनी गंधाळतो
भावनांच्या मैफिलीत शब्दांतुनी ओघळतो.
शब्दातीत हसवे फसवे मकरंदी शब्द
भरकटत्या मनाचे हे आधारकाठी शब्द.
प्रेरणा दिली शब्द वैखरीने सकलांना
शब्दछंदी दातृत्व सोहळा मम भावनांना.
शब्द जिव्हारी झाले कस्तुरी शब्द अभिराम
काव्य पार्थिवते तुज करितो शब्द प्रणाम.
लाभे जन्मांतरीची ही मजला शब्द शिदोरी
उठे बेधुंदी चौफेर शब्द आनंद लहरी!!
-प्रमोद मोहिते, टाळगाव
ता.कराड जि.सातारा
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
रसिका तुजसाठी लिहतो मी शब्दांचे गीत.
गीत माझे शब्द हळवे शब्दांनी गंधाळतो
भावनांच्या मैफिलीत शब्दांतुनी ओघळतो.
शब्दातीत हसवे फसवे मकरंदी शब्द
भरकटत्या मनाचे हे आधारकाठी शब्द.
प्रेरणा दिली शब्द वैखरीने सकलांना
शब्दछंदी दातृत्व सोहळा मम भावनांना.
शब्द जिव्हारी झाले कस्तुरी शब्द अभिराम
काव्य पार्थिवते तुज करितो शब्द प्रणाम.
लाभे जन्मांतरीची ही मजला शब्द शिदोरी
उठे बेधुंदी चौफेर शब्द आनंद लहरी!!
-प्रमोद मोहिते, टाळगाव
ता.कराड जि.सातारा
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
0 टिप्पण्या