माता जिजाऊ
सिंदखेडराजी । तेजस्वी तो तारा
जाधवांच्या घरा । जिजाबाई
लखुजीच्या पोटी । ते देदीप्यमान
रत्नची जन्मून । प्रकटले
अर्धांगिनी शोभे । शूर वीर बाला
राजा शहाजीला । कुलवंत
पुणे नगरीला । नावरूप आले
भाग्यची लाभले । रयतेला
अन्यायाची चीड । कोण ते वारील
अबलांवरील । अत्याचारा
गुरु तू होऊन । तेज:पुंज बाळा
तूच आकारीला । शिवबाला
स्वतंत्र स्थापावे । स्वराज्य आपुले
स्वप्न दाखवले । मनोहारी
कार्य तुझे थोर । कसे फेडू ऋण
मऱ्हाठा म्हणून । अभिमानी
माता तू साऱ्यांची । कन्यकाही तूचि
या महाराष्ट्राची । पराक्रमी
शिष झुकवून । त्रिवार नमन
स्पर्शून चरण । मी पावन
- सुचित्रा पवार, तासगाव
ता. तासगाव, जि.सांगली
0 टिप्पण्या