झोका
दारातल्या निंबोणीला
दोर दादानं बांधला
उशी ठेवून दोरातं
झोका फांदीला टांगला.
झोका फांदीला टांगला
झोका लागला झुलाया
भावभिजल्या शब्दांचं
गाणं कंठात खुलाया.
देह रांगडा रांगडा
झोकावतो झोक्यावर
झुलताना डुलताना
सुखावतो वाऱ्यावर.
पोरं जमली भोवती
खेळ फेरानं रंगतो
आलटून पालटून
झोका जोसात झुलतो.
झोका जोसात झुलता
जीव हरकून गेला
झोका आभायात जाता
जीव पाखरू हो झाला!!
-प्रमोद मोहिते, टाळगाव
ता.कराड, जि.सातारा
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
दोर दादानं बांधला
उशी ठेवून दोरातं
झोका फांदीला टांगला.
झोका फांदीला टांगला
झोका लागला झुलाया
भावभिजल्या शब्दांचं
गाणं कंठात खुलाया.
देह रांगडा रांगडा
झोकावतो झोक्यावर
झुलताना डुलताना
सुखावतो वाऱ्यावर.
पोरं जमली भोवती
खेळ फेरानं रंगतो
आलटून पालटून
झोका जोसात झुलतो.
झोका जोसात झुलता
जीव हरकून गेला
झोका आभायात जाता
जीव पाखरू हो झाला!!
-प्रमोद मोहिते, टाळगाव
ता.कराड, जि.सातारा
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
0 टिप्पण्या