पाऊलखुणा
‘सुमित’ दिसायला स्मार्ट, उंच, गोरापान, जिममध्ये जाऊन शरीर कमावलेले. इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकायला होता, तर ‘अजित’ स्मार्ट, उंच गोरापान पण शिडशिडीत तब्येत असलेला. इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण करून वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. अजित स्वभावाने शांत, प्रेमळ, सगळ्यांची काळजी घेणारा. हुशार कमी बोलका पण रावसाहेब कसबे पाटील यांचा जीव की प्राण!. सुमित धाकटा मुलगा. सुमित आणि अजित यांच्यामधे ‘सायली’ ही मुलगी. दोघा भावांची व रावसाहेब यांची लाडकी. तिने डॉक्टरकी पूर्ण करून एका मोठ्या नोकरीत कामाला होती. घरी पैशाची काही कमी नव्हती. पण रावसाहेब व स्वत: सायलीचे मत असे होते की तिने स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. पण सुमित यांच्यापेक्षा वेगळा. अभ्यासात हुशार असला तरी बापाच्या पैशावर पार्ट्या करणारा, मजा मारणारा होता. खुद्द रावसाहेब हे त्याला चांगले विचार वेळोवेळी समजावून सांगायचे पण पालथ्या घड्यावर पाणी. शेवटचे वर्षे चालू होते. कॉलेजमध्ये नेहमी धिंगाणा, मस्ती, मारामारी. फ्रेशर्सला त्रास देणे हे त्याचे उद्योग चालूच होते. मुलींना फिरवणे, प्रेमाचे नाटक करून उपभोगून सोडून देणे हा त्याचा खेळ झाला होता. त्याच्या तक्रारी रावसाहेब पर्यंत येत होत्या. अजितही त्याला समजावत असे. अशातच त्याचे शिक्षण पूर्ण झाले. तो पुढे नोकरी करेल किंवा वडिलांच्या ऑफिसमध्ये काम करेल असे सर्वांना वाटले पण तो काहीच करेना. आता तर तो अभ्यास नसल्याने मोकळा पडला. यातच सहा महिने निघून गेले. सुमितने परत नवीन काहीतरी लफडे केले. यात त्या मुलीने जीव देण्याचा प्रयत्न केला. सुमितला अटक झाली. रावसाहेबांना खूप राग आला. अजितने कसे बसे सोडवून घरी आणले. रावसाहेबांनी सुमितची कान उघडणी केली, “बापाच्या जीवावर माज करण्यापेक्षा भावासारखे कमवून माज करा. तुम्हाला आमचा मुलगा म्हणायला लाज वाटते! नीट वागायचे, नीट रहायचे असेल तर माझ्या घरात रहायचे नाही तर निघायचे. आम्ही हा व्यवसाय शुन्यातून उभा केला आहे. खूप कष्ट घेतले आहेत हे नाव आणि पैसा कमवायला. तुम्ही अशा रीतीने धुळीस मिळवू शकत नाही.” सुमित नाराज होऊन रुममध्ये निघून गेला. पण रावसाहेब यांच्या छातीत दुखू लागले. समोर सायली, निमाताई, अजित बसलेले होते. त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. त्यांना हृदय विकाराचा तीव्र धक्का बसला होता. संध्याकाळी सुमितला भूक लागल्याने खोली बाहेर आला तर घरात सामसूम होती. घरातल्या आशाबाईला विचारले असता तिने दुपारी घडलेला प्रसंग सांगितला. बाबांना एवढं घडले आणि आपणास कोणीच काही सांगू नये याचं त्याला खूप वाईट वाटले. रात्री आई व बहीण घरी आले पण त्याच्याशी कोणी बोललं नाही. सुमित निमाताईला बोलायला गेला तर त्या म्हणाल्या, “माझ्या पतीला काही झाले तर मी तुला आयुष्यात कधी माफ करणार नाही.” दुसर्या दिवशी सुमित दवाखान्यात गेला. अजित त्याला काही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यात अश्रू होते. चार पाच दिवसात रावसाहेब घरी आले. सुमित आता शांत झाला होता. तो आता जास्त वेळ रुममध्येच राहत असे. तो नोकरचे फॉर्म भरत होता. रावसाहेबांची तब्येत हळूहळू सुधारत होती. महिना होत आलेला, रावसाहेब आता पूर्णपणे ठीक झाले होते. सुमितशी ते फार बोलत नव्हते. एका रात्री जेवणाच्या टेबलावर जेवण संपल्यावर सुमितने आपणास नोकरी लागली असून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात एका धरणाच्या कामाचे काम मिळाले आहे. आपण लवकरच तिकडे जाणार आहोत. सगळे अवाक होऊन त्याच्याकडे पहात होते. तेवढ्यात निमाताई म्हणाल्या, “अजितच्या लग्नाचे चालले आहे. तू नंतर जा हवं तर.” “आई दादाच लग्न जमल्यावर सांग, मी नक्की आठ दिवस सुट्टी काढून येईन. पण आता नोकरी नवीन आहे. मला आता जायलाच हवे.” तो पुढच्या आठ दिवसांत तो गडचिरोली जिल्ह्यात त्या छोट्याश्या खेड्यात निघून गेला.
गडचिरोलीत कोरची गावाजवळ ते धरण बांधण्यात येत होते. सुमितच्या घरात लग्नाची तयारी चालू होती. शिवराज दळवी यांची कन्या ममता हिच्याशी अजितचं लग्न ठरले होते. ममता लहानपणापासून रावसाहेब यांच्या घरी खेळलेली, येत जात राहिलेली होती. ममता ही रावसाहेब यांच्या दूरच्या बहिणीची मुलगी पण शिवराज दळवी हे रावसाहेबांच्या ऑफिसमध्ये कामाला असल्याने सुमितच्या घरी त्यांचे येणे जाणे होते. ममताने बी.एससी करून एम.बीए केलं होतं. सुमितने तिलाही प्रेमाचं वचन देऊन खूप ठिकाणी फिरवलं होते. पण नशीब ती ओळखीची असल्याने तिच्यासोबत काही वावगं केलं नव्हतं. पण सुमितच्या स्वभावाचा तिला ठाव कळल्यानंतर तिने हळूच त्याच्याशी संबंध तोडले होते. याचा सुमितवर काही फरक पडला नव्हता. करोचीत पोहोचल्यावर सुमितला तिथले वातावरण बघून राग आला. कुठल्याही सुखसोयी उपलब्ध नव्हत्या. पण नैसर्गिक वातावरण मात्र अतिशय सुंदर होतं. चहुबाजूने डोंगर, नद्या, जंगल भाग. साईटवर त्याची राहण्याची सोय केली होती. तेथे पोहचल्यावर त्याने पाहिलं की त्याला अतिशय उत्तमरीत्या राहण्यासाठी सोय केली होती. त्याचं क्वार्टर थोड्या वर भागात होते. बाकीच्या ऑफिसरसाठी थोडं दूरवर क्वार्टर होते. तर समोरच्या खालच्या बाजूला कामगारांची घरं होती. त्याच्याघरी कामासाठी लक्ष्मी येत होती. तिचं घरही समोर कामगारांच्या घरासोबत होतं. लक्ष्मी दिसायला सुंदर, गोरीसी बुटकी तिला मुलं होतं नाही म्हणून नवऱ्याने सोडलं होतं. लक्ष्मी आदिवासी नव्हती. सुमितच्या क्वार्टरच्या एकदम समोर चुईमुईचं घर होतं. चुईमुई आदिवासी भागातली होती. दिसायला सावळी असली तरी रेखीव भरीव शरीराची, सुंदर होती. तिला सहा वर्षाची एक मुलगी होती. तिचा नवरा दारू पिऊन मारायचा म्हणून तिने त्याला सोडून इथे कामाला होती. पण तिच्या जवळ जायची कोणाची टाप नसायची. एकदम फटाकडी, रागीट होती. हात जरी लावला तरी हात मोडून टाकणाऱ्यातली होती. वस्तीवरचे सगळे तिला टरकून असायचे. सुमित इथे कामाला आल्यापासून सगळ्या पोरी बायका त्यालाच पहात रहायच्या. तो घरात वा अंगणात बर्मुडा घालून शर्ट न घालता फिरू लागला की सगळ्या दारात थांबलेल्या असायच्या त्यामुळे तो जास्त करून टीशर्टवरच फिरायचा.
चुईमुई दररोज जाणून बुजून सुमितच्या समोर फिरू लागली. सुमितच्या नजरेत ती भरली. सुमितच्या स्वभावाने परत उचल खाल्ली. इथे त्याला टोकणार कोणी नव्हतं. एके दिवशी संध्याकाळी लक्ष्मी स्वयंपाक करून गेल्यावर चुईमुई सुमितला चिकन देण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी आली. चिकन दिल्यावरही ती जाईना सुमितशी लगट करत घरात फिरू लागली. दहा-पंधरा मिनिटे सुमितने आपल्या भावनांवर खूप कंट्रोल ठेवला पण शेवटी तो पुरुष आणि बिघडलेला. त्याने चुईमुईला अलगद उचलून आत नेले. चुईमुईने कोणताही प्रतिकार केला नाही. आता हे अधूनमधून नेहमीचं होऊ लागले. लक्ष्मीच्या हे लक्षात आले. ती तिच्यावर जळू लागली. कारण तिचंही सुमितवर प्रेम जडले होते. पण सुमित तिच्याकडे पाहिना. चुईमुई सुमित पेक्षा चार वर्षे मोठी असेल पण लक्ष्मी ही दोन वर्षे लहान सुमित सत्तावीस वर्षाचा होता. आता लक्ष्मीही सुमितला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करू लागली. लवकरच तीही त्यात सफल झाली. सुमित तिच्याशीही संबध ठेवू लागला. यामुळे चुईमुई आणि लक्ष्मी यांच्यात भांडणे होऊ लागले. सुमितला अजितचा फोन आला की त्याचे लग्न जमले आहे. “पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे. तू ये.” सुमित चार दिवसांत कोरचीहून निघणार होता. दोघींचा जीव मात्र खालीवर होत होता. ज्या दिवशी सुमित मुबंईला घरी परत जाणार होता. त्या दिवशी लक्ष्मी आणि चुईमुईचे लक्ष सुमितच्या घराकडेच होतं. लक्ष्मी शांत असल्याने तिची लोकात जास्त चर्चा नव्हती पण चुईमुई उथळ असल्याने लोकात तिच्या व सुमितच्या संबंधांबाबत कुजबूज होती. लोकं दोघा विरूद्ध जोरात चर्चा करू शकत नव्हते. कारण सुमित मेन इंजिनिअर होता. तो कोणालाही नोकरी वरून काढू शकत होता तर चुईमुई त्या माणसाचे काय हाल करेल हे सांगता येत नसे. जायला एक-दोन तास शिल्लक असतील सुमितने लक्ष्मीला डब्बा बनवून घर आवरून जाण्यास सांगितले. तो आपली बॅग पॅक करू लागला. एक तासानंतर सर्व काम आटोपून डबा भरून लक्ष्मी जायला निघाली तेवढ्यात चुईमुई चिकनचा डबा घेऊन सुमितकडे आली. तिला वाटले लक्ष्मी गेली असेल. सुमित मात्र कोंडीत पकडला गेला. चुईमुई घेऊन आलेल्या चिकनच्या डब्याचा घमघमाट सुटला होता. पण चुईमुईने अंगाला जे काही लावले होते त्या सुगंधाने सुमितला बेधुंद करत होते. तो बैचेन झाला. लक्ष्मी लवकर निघून जावे असे त्याला वाटू लागले. पण लक्ष्मी चुईमुईला बघून निघेना. शेवटी सुमितने, “लक्ष्मी तू जा आता, मला चुईमुईशी कामानिमित्त थोडे बोलायचं आहे”. लक्ष्मीचा चेहरा उतरला, जाताना इंजिनिअर बाबू आपल्याला कडकडून भेटेल मगच जाईल असे वाटत होते पण तसे काही झाले नाही. आपल्या पेक्षा साहेबाला चुईमुई आवडते हे पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती डोळे पुसतच घराबाहेर पडली. ती ज्या दरवाजाने गेली त्या दिशेला चुईमुई पाहून हसली. ती वळणार इतक्यांत सुमितने तिला अलगद उचलून घेतले आणि आत नेले. चुईमुई सुमितच्या घराबाहेर येईपर्यंत लक्ष्मी रडतच आपल्या दारात थांबली. थोड्या वेळाने चुईमुई हसत घराबाहेर पडताना दिसली. ते पाहून लक्ष्मीच्या छातीत कळ उठली ती रडतच पंलगावर पालथी पडली आणि उशीत तोंड खुपसून रडू लागली. तिची आई तिला सारखं विचारू लागली, “काय झाले ग लक्ष्मी, कुणी काई बोललं का? साहेब रागावले का? ते चालले म्हणून तर रडत नाहीस ना, अगं येतील नव्हं लवकरच परत. तू त्यांच्यावर जीव तर नाही टाकला. आगं ते मोठे माणसं त्यांच्या नादाला लागू नये पोरी. कपड्यावाणी वापरून फेकून देतील. पायपुसणी होऊन पडावं लागल. इज्जत जाईल ते वेगळीच. तू आधीच टाकलेली बाई हाईस. लोकं नाही, नाही ते बट्टा लावतील. नाहीतरी लोकं म्हणत्यात की साहेबांबरोबर चुईमुईन सूत जमवलं हाय. ती कशी हाय ते तुला माहीत हाय नव्हं. बाईची इज्जत काचंवाणी असत्याय बघ एकदा तुटली की जुडत नाही. तू माझी शहाणी बाय हाईस नव्हं”.
सुमित एका वेगळ्याच तृप्तीने गाडीत जाऊन बसला. तो रेल्वेने मुबंईला निघाला. घरी त्याला मोठा हादरा बसणार होता, हे त्याला माहितच नव्हतं. रात्रभराचा प्रवास संपवून तो मुबंईला पोहचला. अतिशय आनंदात घरी पोहचला. घरात साखरपुड्याची लगबग चालू होती. सगळे गडबडीत होते. त्याला पाहून आईला व बहिणीला खूप आनंद झाला. अजित तर त्याला कडकडून भेटला. बाबा जास्त काही बोलले नाहीत पण खूश होते. ये अजित मुलगी कोण सांगितले नाहीस,आता तरी सांग ना? अरे सांगायचे कशाला, तू तुझ्या डोळ्यानेच पहा न, हॉलवर गेल्यावर. त्याला मुलगी कोण हे सांगतच नव्हतं. सगळे हॉलवर गेले. अजीत सुमित, सायली सगळे स्टेजवर होते. सगळे मुलीची येण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात स्टेजकडे सजलेली नवरी मुलगी येऊ लागली. तिला पाहून सुमितला घेरी येते की काय असे वाटू लागले.
सुमितने जेव्हा ममताला स्टेजकडे नवरीच्या वेशात येताना पाहिले आणि त्याला चक्करच आली. आपण जिला इतकं फिरवलं तिलाच आपल्या भावाची बायको करत आहेत. ममतानेही एक नजर सुमितकडे पाहिलं आणि तिने आपली नजर वळवली. सुमित नोकरीला गेल्यापासून आणि वडिलांना अॅटक आल्यापासून शांत झाला होता. धांगडधिंगा वा जोर जोरात हसणे, मस्ती करणे बंद झाले होते. इथे कार्यक्रमात तर तो अजूनच शांत झाला होता. ममता समोर अपराधी होऊन फिरत होता. घरच्यांना काही सांगूही शकत नव्हता. त्याने तो दिवस कसाबसा काढला. घरी परतल्यावर सगळ्यांशी जुजबी बोलून आपल्या रुममध्ये गेला. सुमितच्या आईला वाटले, इतक्या दिवसांनी तो आलाय आपल्या मागे मागे करेल, आई हे दे, ते कर म्हणेल. पहिल्यासारखे गळ्यात पडून आई फक्त माझी म्हणेल, पण तसं तो काही न करता शांतपणे जेवण करून निघून गेला. रावसाहेबांनाही तो एकदमच बदलल्या सारखं वाटलं. पण सुमित दुखावला गेला होता हे कोणाला कळले नव्हते. सगळ्यांच असं मत पडलं की सुमित असेपर्यंत लग्न ही उरकून घ्यावे, तो परत परत येईल की नाही माहीत नाही. ममताच्या घरचेही तयार झाले. सुमितला बाहेर बोलावून हे सांगण्यात आले. दुसर्या दिवसांपासून सगळे लग्नाच्या तयारीला लागले. सुमितने ममताची माफी मागून पुढच्या आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. इकडे सुमित चार दिवस जातो म्हणून गेलेला, आठ दिवस झालेतरी आला नाही म्हणून चुईमुई व लक्ष्मी बैचेन होत्या. पंधरा दिवस सुमित राहून अजितचे लग्न व पुजा पार करून कोरचीला परतला. सुमितला पाहून दोघी पार हरकून गेल्या. आज सुमितसाहेब आपल्यालाच बोलवतील जवळ असा दोघींचा समज झाला. पण सुमित थकून झोपी गेला. पुढचे चार-पाच दिवस तो दोघींकडे पाहिनाही. त्यांना वाटले की साहेब पण लग्न करून आले की काय? असाच आठवडा गेला आणि एके दिवशी सकाळी सुमित पेपर वाचत बाहेर पोर्चमध्ये बसलेला असताना चुईमुई अंघोळ करून घरात जाताना दिसली. ओल्या अंगाला चिकटलेल्या साडीला पाहून सुमितचे मन परत उचल खाल्ले. सुमितने इकडे तिकडे पाहिले कोणी पहात नाही पाहून तो सरळ चुईमुईच्या घरात घुसला. चुईमुईची पाच वर्षाची पोरं झोपलेली होती. चुईमुई मंदाकिनी रुपात केस पुसत होती. सुमितने तिला गच्च पकडले ती शहारली. थोड्या वेळाने सुमित आपल्या घरी निघून गेला. दोन-चार लोकांनी त्याला जाताना पाहिलं. अर्धातास गेला असेल आणि चुईमुईच्या घरासमोर गोंधळ ऐकू येऊ लागला. सुमित बाहेर गेला तर चुईमुईचा नवरा तिला मारत होता, घाण घाण शिव्या देत होता. सुमित पळत तिकडे गेला आणि चुईमुईला सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. तर तिचा नवरा त्यालाच म्हणाला, “ऐ मागे सरक, ही माझी बायको हाय, तुझी रंडी होऊन राहत असली तरी”. त्याचे हे शब्द ऐकून तो झटपटला. आतापर्यंत त्याने अनेक उपोद्याप केले असतील पण असे त्याला कोणी बोललं नव्हतं. त्याने झटकन त्याचा हात सोडला आणि ताडताड आपल्या घरात निघून गेला. लक्ष्मी आज खूप खूश होती, तिला वाटलं आपल्या मार्गातील अडसर दूर झाला. पण बदलेल तो सुमित कुठला. लागलेल्या घाण सवयी इज्जत गेली तरी जात नसतात, तसं त्याचं त्याचं झाले होते. काही दिवस तो चुईमुई पासून दूर राहत होता. लोकांना दाखवत होता की तो आता वागत नाही, पण लक्ष्मीला तो घरी स्वयंपाक करायला आल्यावर सोडत नव्हता. आपण चुकतोय हेच त्याला कळतं नव्हते. तो आपल्या इच्छेचा गुलाम झाला होता.
सुमितला येऊन आता चार पाच महिने झाले होते. सगळं छान चाललेलं होतं. चुईमुईला तो कधीतरी जवळ करायचा कारण तिचा नवरा इथेच येऊन रहात होता. दारू पिऊन दररोज गोंधळ घालायचा. एके दिवशी धरणाच्या बांधावरून चालताना त्याचा दारूच्या नशेत तोल गेला. तो खाली दगडावर आपटला. खूप मार लागला तो दवाखान्यात अॅडमिट झाला. डोक्याला मार लागल्याने तो कोमात गेला. तो गडचिरोलीत दवाखान्यात होता. चुईमुई जास्त आता तिकडेच असायची. सुमित आता जास्त वेळ लक्ष्मी सोबत घालवू लागला. धरणाचे कामही अर्धवट होतं आलेले होते. सुमित या गावठी भागात बराच रमला होता. अधूनमधून तो आदिवासी भागात फिरत असे तिकडेही आदिवासी महिला चांगल्या वाटल्या तर त्यांनाही भरपूर पैसे देऊन मजा करत असे. असाच वर्ष संपला पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणाचं काम पूर्ण व्हायला पाहिजे नाही तर दलदल तयार होते इथे फिरायला येत नाही अस वरच्या लोकांच म्हणणं होतं. पण सुमित इथे मजेत असल्याने तो हे काम लवकर पूर्ण करायच्या नादात नव्हता. एके दिवशी सुमित पेपर वाचत बसला असताना लक्ष्मी आली,
“साहेब मला काही बोलायचं हाय”.
“हं बोल की,”
“इथं नको आत चला की”, सुमित हसत आत गेला.
“काय लक्ष्मी, तुला काय सकाळी सकाळी हुक्की आली की काय?”. पण लक्ष्मी वर बघेना. सुमितने तिची मान वर केली तर डोळ्यात पाणी.
“अगं, काय झालं? का रडतेस?”
“साहेब मला दिवस गेलेत. आपलं बाळ हाय पोटात”.
“काय? हे काय बोलतेस? तू शुद्धीवर आहेस ना? तुला तर मुलं होतं नाही म्हणून नवऱ्याने सोडली ना, मग कशी. माझंच मुल आहे ना हे की आणखी कुणाचं?. ते काहीही असो. पाडून टाक त्याला. उगीच बदनामी नको”. असं म्हणत सुमितने तिच्या हातात पाच हजार कोंबले आणि घरी पाठवले. लक्ष्मीची आई तिची वाटच बघत होती. “कागं लक्ष्मी तब्येत बरी नसताना कशाला गेली ग कामाला?” लक्ष्मी हमसून रडू लागली. आईच्या गळ्यात पडून आपण गरोदर असल्याचे सांगितले. तिच्या आईला रडावं की हसावं कळेना. आपल्या मुलीला मुलं होऊ शकते याचा आनंद होतं होता, तर हे मुल तिच्या नवऱ्याचं नाही हे ऐकून नि:शब्द झाली होती. दुसर्या दिवशी लक्ष्मीची तब्येत बरी नाही सांगून तिने तिला आदिवासी पाडावर घेऊन गेली. तब्बल पंधरा दिवसांनीच परत आली. तोपर्यंत वस्तीवरील बायका सुमितला डबा देत होत्या. लक्ष्मी परत आल्यावर ती न येता तिची आई सुमितकडे कामाला येऊ लागली. कामावर आल्यावर सुमितला खूप ऐकवलं. म्हणाली, “काम सोडलं तर लोकांना वाटेल लक्ष्मीला तुम्हीच काहीतरी केलंत म्हणून मलाच यावं लागले”. लक्ष्मी आता धरणाच्या कामावरही येत नव्हती. चुईमुई व लक्ष्मी दोघीही सुमितच्या हातातून गेल्या होत्या.
सुमित येथून जाण्याचा विचार करत होता. त्यातच चुईमुईचा नवरा गेला. त्यामुळे चुईमुई काही दिवसाने का होईना आपल्या ताब्यात येईल या विचाराने तो तेथेच थांबला. चुईमुईचा नवरा वारला आणि सुमित असा विचार करत होता. हे जर कोणी ऐकलं तर तो किती खालच्या पातळीवर जाऊन विचार करतोय असं वाटलं असतं. खरं तर लग्न झाल्यापासून चुईमुईला शारीरिक, मानसिक आणि भावनिक, आर्थिक असं कसलीचं मदत त्या नवऱ्याची झाली नव्हती. अट्टल दारुडा नवरा तिला भेटला होता. खूप दारू पिऊन येणे स्वत:च्या सुखासाठी चुईमुईला उपभोगणे तिनं काही बोललं तर मारझोड करणे हेच चालू होते. पण मुलगी झाल्यावर तर ते जास्तच वाढलं. ही मुलगी माझी नाही असं म्हणून मुलीलाही मारू लागला. एके दिवशी ती कामाला गेल्यावर मुलीला मारुन टाकण्याचा त्याने प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी मुलीला वाचवलं आणि चुईमुईला बोलावून घेतलं. तेंव्हा जे चुईमुईन नवऱ्याच घर सोडलं ते सोडलंच. पण माहेरी तर खाण्याचे खूपच वांदे. शेवटी ती आपलं वेगळं घर मांडून, कमावून खाऊ लागली. पण तो अधूनमधून यायचा तिच्याकडून पैसे घ्यायचा, मारायचा. तिनं हाकलून दिले की निघून जायचा. असं चारवर्षे चालले होते. चुईमुई सावळी पण सुंदर, भरलेल्या शरीराची किती दिवस आपलं मन मारेलं. वरून पोट आणि पैसे यासाठी ती काहीही करायची. सुमितवर तर तिचा जीव जडला होता. तो आपल्याला आधार देईल असं तिला वाटायचं. पण लक्ष्मीला दिवस गेले आणि सुमितनं ते मुलं पाडायला लावलं हे ऐकून ती चलबिचल झाली होती. त्यातच आता नवरा वारला होता. पुढे खूप सावधगिरीने पाऊल उचलावं लागणार होतं.
सुमितला जेव्हा चुईमुईच्या नवऱ्याचं कळल्यावर आपण जावं का पहायला त्याला असं वाटू लागलं. पण लोकं काय म्हणतील, आणि तिच्या पाडावर गेलं आणि तिथं आपल्या बद्दल कळाले तर ते लोकं आपल्याला सोडतील का? या विचाराने तो घरीच थांबला. चुईमुईच्या नवऱ्याला वस्तीवर काही वेळासाठी आणलं गेलं. तेथून त्याला पाडावर नेण्यात येणार होतं. सुमित चुईमुईच्या घरासमोर गेला. समोरच मोकळ्या जागेत चुईमुईच्या नवऱ्याला ठेवलं होतं. चुईमुई शेजारी बसली होती. पांढरं कपाळ, रडून रडून डोळे सुकलेले व सुजलेले. उदास चेहरा अंग भरून साडी तिने नेसली नव्हती. आज तिने आदिवासी वेश धारण केला होता. त्यामुळे तिचं अर्धं अंग उघडंच होतं. अशा परिस्थिती ही सुमितची नजर चुईमुईच्या उघड्या शरीरावर जात होती. आपण चुकतोय ही त्याला जाणीव झाली आणि तो आपल्या घरी परत आला. चुईमुई पाड्यावर निघून गेली. महिना झाले तरी ती आली नव्हती.
सुमितच्या घरी आता सायलीच्या लग्नाची तयारी चालू होती. सुमितला तिकडे पंधरा दिवस रहायला ये म्हणत होते पण ऐवढी सुट्टी मिळत नव्हती. तो आठ दिवसाची रजा टाकून लग्नाला गेला होता. त्यावेळीही तो ममता समोर जास्त जात नव्हता. सायलीचे लग्न करून आल्यावर सुमितला एकटं एकटं वाटत होतं. त्यातच चुईमुई पण येत नव्हती. लागलेल्या सवयी जातील थोड्याच पण सुमित पाड्यावर फिरायला घाबरत होता. त्याला वाटायचं की पाड्यातील लोकं त्याला चुईमुईच्या नवऱ्याच्या मृत्युला जबाबदार धरून मारतील. पण आज त्याला करमत नव्हते, त्याने सायंकाळी काम संपल्यावर पाच वाजता जीप घेऊन फिरायला निघाला. बराच जंगली डोंगराळ भाग फिरल्यावर त्याला छोटा पाडा दिसला पण उंचावर होता त्याने खाली गाडी ठेवून वर चढून गेला. अतिशय सुंदर ठिकाण होतं तेपण इनमीन पंधरा वीस घरं होती. घरे कसली मातीने शेकिरलेल्या झोपड्याच होत्या. काही बंद तर काही उघड्या तो इकडे तिकडे बघत फिरत असताना समोरच्या घरासमोर अंगणात बाजेवर बसलेला एक वयस्कर माणूस थोडं पळतच सुमितकडे आला.
“आवा आवा साबजी!”. तो माणूस वेशभूषामुळे आदिवासी वाटत होता पण तो आदिवासी नव्हता. थोडासा शहरी, शिकलेला गोरासा होता.
“आवा साबजी, हे माझं गरीबाचं घर बसा हितं बाजवर”. सुमित बाजेवर बसला. त्याला बसायला एक वेळूच गोल चुमड घेतलं.
“साबजी मी संबा, आदिवासी नायजी मी, मी पुण्याकडचा हाव बघा. शिकलेला हाव थोडासा पण चोऱ्यामोऱ्या करायचो. पुलिस मागं लागलं म्हणून हिकडं पळून आलो आणि हिकडंच राहलो बघा. इथंच घर केलो बघा”.
“डोरली बाहेर ये”. एक वयस्कर बाई बाहेर आली.
“ही माझी बायको डोरली. मला सात लेकरं हायती. पाच पोरी दोन पोरं. तीन पोरीची आणि दोन पोराची लग्न झालती. पोरं समोरच्या घरात राहतेत. धरणाच्या कामासाठी पोरांसनी आमच्याकडं सोडून गेलती. एक पोरगी याच पाड्यावर असती दोघी दुसरीकडे. सगळे धरणावर कामास हायती. या दोन पोरी लग्नाच्या हायती. कुरली आणि नकोशी”.
“‘नकोशी’ असं कसं नाव आहे तीचं?”.
“काय साहेब, आवो आम्हाला परत मुलगी नको असली आणि मुलगी झाली की तीच नाव नकोशी ठेवतो मग पुढे मुलगी होतं नाय बघा”.
“अहो पण असं कसं आपण आपल्या लेकराला नकोशी म्हणायचं?”.
“साबजी खायला मिळणं बंद झाल्यावर सगळं असंच असतयं बघा!”. सुमित नकोशीकडे पाहू लागला. ती कुण्यालाही परीने आदिवासी दिसत नव्हती.
“तुमचीच मुलगी आहे ना ही?”
“आमचीच म्हणायची साबजी, बायकोची हाय ती”. असं म्हणून खी खी करत हसायला लागला. त्याचं ते किळसवाण हसणं बघून सुमितला कसंतरी झाले. त्यानं दिलेला चहा संपवून उठायला लागला तर संबा म्हणाला,
“साबजी तुम्हाला हवं असलेलं सुगंधी फुलपाखरू आमच्याकडं हाय बघा”. सुमित न कळाल्याने संबाकडे पाहू लागला.
“ते जी तुम्ही जे सगळ्या पाडावर शोधता, ते हाय इथंपण पाचशे रूपये लागतील”. सुमित घाबरून जाऊ लागला.
“घाबरू नका या पाड्यावर धरणावरील सगळे हाफीसर येतात”. सुमित माघारी वळला, संबाने सुमितला समोरच्या झोपडीत नेले आणि बाजेवर बसवले पाठवतो म्हणून निघून गेला. सुमित बाजेवर वाट बघत असताना नकोशी हातात कसलातरी ग्लास घेऊन आली. कोवळी, सुंदर सोळा वर्षांची मुलगी ती,
“काय आणलसं नकोशी, महुआ हाय जी,पी”.
“ठेव तिथं आणि जा”. नकोशीने तो ग्लास एका चुमड्यावर ठेवला आणि दरवाजा बंद करायला गेली. सुमित एकदम चकमला
“तू आणि इथं?”. तो ताडकन उठला आणि बाहेर जाऊन,
“संबा इकडं ये”. संबा पळत आला.
“काय झालं जी”.
“अरे ही एवढी लहान मुलगी तू हिला पाठववलंस”.
“साहेब तिला चार पाच महिन्यांचा अनुभव आहे. तिची आई हेच करायची, तिच्या बहिणी मोरली, मुथ्थी, गुट्टी, कोरली, सगळे हेच करायचे अजूनही करतात”.
“असू दे,पण तुला लाज वाटंना का रे?. स्वत:च्या मुलींना असं करायला लावतो. तुला लाज वाटली पाहिजे!”.
“साहेब पोटासाठी करावं लागतयं बघा. लाज वाटली पाहिजे रे असं करताना”.
“धरणावर ये, मुलींना पण घेऊन ये, काम देतो पण ऐवढ्या लहान पोरींना असले धंदे करायला लावतो” ऐवढे बोलून तो रागात तणतणत निघून खाली आला. दिलेले पैसेही परत घेतले नाहीत. चला नाही म्हणायला सुमितमध्ये अजूनही थोडीशी माणुसकी जिवंत होती. तो चलबिचल झाला. खायला नाही, कपडे नाहीत, रहायला घर नाही, दवाखाना आणि शाळा तर दूरच राहिले. कसं जीवन जगत असतील हे आदिवासी लोक. बाबा खरंच म्हणत होते, बापाच्या पैशावर मजा मारने सोपे असते. खरं जीवन जवळून बघ कळेल. आज त्याला कळाले होते.
सुमित वस्तीवर परत आला पण बैचेन होता. घराच्या पडवीत थांबून खाली पाहू लागला तर त्याला छोट्या छोट्या झोपडीत गर्दी करून राहणारे लोक एकाच्या घरात लाईट तर एकाच्या घरात दिवा, अंधारात फिरणारे लोक, अर्धं वस्त्र घालणारे लोक, मातीत खेळणारे लहान मुलं थकलेले लोक बाहेर बाजेवर थंडीत कुडकुडत पडलेले. हे चित्र पाहून त्याला गलबलून आले. तो आत जाणार इतक्यांत त्याला गलका ऐकू आला. वॉचमनला काय झालं म्हणून विचारले तर तो म्हणाला,
“साबजी साप चावला जी, बाईले, लेकुरवाळी हाये बघ. दोन पोट्टे आण एक पोट्टी. लहान जीव हायजी तिचा”.
“कसं घेऊन जाणार आहात तिला”, असं विचारेपर्यंत तिला झोळीत टाकून चारजण उचलून नेत होते.
“कुठे घेऊन जाणार हिला?”.
“साबजी, मांत्रिक राहतोजी चार कोसावर तो उतरवलं इष हिचं.नाही उतरलं तर तिला दवाखान्यात नेतील ते तर दहा कोसावर हाय जी. अंधारात तिला दिसलं नाही, चुलवन पेटवण्यासाठी लाकडं उचलली तर खाली साप होता”.
“काय दहा कोस म्हणजे वीस किलो मीटर अरे मरेल ती कसं जाणार?”
“पळत जी नाहीतर गाडी मिळाली तर बघतो. वाचली तर नशीब,मेली तर दु:खजी”. सुमित दचकला,
“चला मी नेतो अंधारात” “कसं जाणार?”, त्याने जीप काढली. त्या बाईला आत टाकलं. तिच्या नवऱ्याला , दीराला, एका बाईला आणि अजून दोघांना घेऊन निघाला. अंधारात गाडीच्या उजेडात ही रस्ता दिसत नव्हता. तिथं हे कसे पळत जाणार होते. डोंगराळ,जंगली भाग. साप आणि जंगली जनावरांची भीती वेगळीच. तसल्या भागातून दिसत नसतानाही सुमितने त्या बाईला पंधरा मिनिटांत तेथे पोहचवले. तेथे गेले तर दवाखाना कसला एक रुम आणि चेकप रुम एवढंच. डॉक्टरही आत नव्हता. कंपाउडर गप्पा मारत बाहेर बसलेला. डॉक्टरला बोलव म्हटले तर ते घरी गेले येणार नाहीत असं तुसडेपणाने म्हणाला, कोण बोलतंय हे न पाहता फक्त आदिवासी बाई पेशंट म्हणून लक्ष देत नव्हता. कधी येणार डॉक्टर? रात झाली येत नाहीत बसा गुमान तिथं. सुमितला राग आला, त्याने त्याचे कॉलर पकडले, “डॉक्टरला बोलावतो की दाखवू हिसका”. तेंव्हा त्याचं लक्ष सुमितकडे गेलं. एक ऑफिसर बोलतो म्हंटल्यावर हबकला. पळत डॉक्टरच्या घरी गेला. डॉक्टर आले तर लवकर पेशंटकडे बघेनात. सुमितने धमकी दिली की, “तुमच्या हलगर्जीपणामुळे पेशंटला काही झाले तर दोन वर्षेसाठी खडी फोडायला पाठवेन”. डॉक्टर घाबरून त्या बाईचा इलाज करू लागले. ते आदिवासी लोक आपल्या भाषेत काहीतरी डॉक्टरला सांगत होते पण ते सुमितला कळत नव्हते. सगळे काळजीने बसले होते. रात्रीचे बारा वाजत आलेले. त्या बाईचा इलाज करून झालेला पण ती शुद्धीवर आली नव्हती. तिच्यासोबत आलेली बाई काहीतरी मंत्र पुटपुटत होती. “हिला मांत्रिकाकडे न्यायला पाहिजे होते” असं काहीजणं म्हणत होती. तेवढ्यात डॉक्टर आले, “तिच्या जिवाचा धोका टळला आहे. काळजी नाही,पण घाबरून धक्का बसल्याने ती शुद्धीवर आली नाही. तिला झोप लागली आहे. काळजी करू नका”. हे ऐकल्यावर सगळ्यांना चांगले वाटले. सगळे तिला बघण्यासाठी आत आले. आत मंद बल्ब लावलेला होता. त्या उजेडात ही ती एकदम लावण्यवती दिसत होती. काळं रुप, सावळा रंग उन्हात राबून काळा पडला होता. पण ते रुपही सुमितला खूप भावलं. असं रुपही सुंदर असू शकते याची त्याने कल्पनाही केली नव्हती. तो टक लावून तिला पाहू लागला. दरदरीत नाक, टपोरे डोळे, तकतकीत त्वचा चमकणारी, सव्वीस सत्तावीस वर्षाची, अंगाने भरलेली ,लाल नाजूक ओठ, तो किती वेळ तरी तिच्याकडे पहात राहिला. पण सगळे त्याच्याकडे देवदूत समजून पहात होते. तिचा नवरा तर पाया पडू लागला. तेंव्हा कुठे तो भानावर आला. त्याने त्याला उठवले. “आम्ही आता निघतो,तू थांब इथं. सकाळी घ्यायला येतो. पैसा दिलेला आहे, काळजी करू नकोस”. तिचा नवरा जवळ थांबला बाकी घरी निघून आले. दुसर्या दिवशी तो तिला आणायला गेला. वस्तीवरचे तिला जिवंत पाहून सुमितचे आभार मानत होते. सुमितने त्याच दिवशी बैठक घेऊन लहान मुलांसाठी शाळा, खूपच लहान मुलांसाठी सांभाळग्रह व दवाखाना उघडण्यासाठी तयारी करायची. आतापर्यंत एवढे ऑफिसर आले पण त्यांनी हा प्रयत्न केला नव्हता. तेथील ऑफिसरच्या बायका शिकलेल्या असतील तर त्या या शाळेत शिकवतील. त्याने वडिलांना आणि कलेक्टर ऑफिसला काही लेटर पाठवले. सुमितच्या वडिलांच्या ओळखीमुळे लवकर काम झाले. तोपर्यंत सुमितने तिथले तीन-चार पत्र्याची शेड रिकामी करून घेतली. आपला मुलगा किती सुधारला आहे. आता आपल्या सारखी समाज सेवाही करत आहे,याचे सुमितच्या वडिलांना अभिमान वाटला. सुमितने दवाखान्याची सोय होईपर्यंत शाळा व सांभाळ ग्रह सुरू करायला लावले होते. त्यामुळे कामगार बायका निर्धास्तपणे कामावर येत होत्या. मुलांना स्वच्छ आणि चांगले पण ठेवत होत्या. मुलांच्या कपड्यांची व वह्या पुस्तकांची सोय झाली होती. यातच ऐके दिवशी राधाची आजी वारल्यामुळे तिची आई कामावर येणार नाही म्हणाली. सुमितला मोठा प्रश्न पडला की आता घरातील कामं कोण करेल पण ज्या बाईला साप चावला होता आणि ती वाचली होती. ती त्याच्या घरी कामाला येऊ लागली. सुमित खूप खूश होता. तिला कधी आपली करून घेतो असे त्याला झाले होते. तिचं नाव ‘सुमडी’ होतं. सुमित दिसायला गोरापान आणि स्मार्ट होता. त्यामुळे सुमडी सारखं त्याला निरखत असे. सुमितच्या लक्षात आले की तिला आपण आवडतो. एके दिवशी आदिवासी लोकांचा काही तरी सण होता. सुमडीने आदिवासी पेहराव केला होता. पिवळ्या रंगांच्या गुडघ्यापर्यंत नेसलेल्या साडीत ती अतिशय सुंदर दिसत होती. अंगात ब्लाऊज न घालता कापड बांधलेलं. गळ्यात रंगीबेरंगी मण्यांच्या माळा .केसात कशाचे तरी पिवळे फुल. एखाद्या शिल्पकाराने काळ्या दगडात मुर्ती कोरल्या सारखी दिसत होती. सुमितची नजर तिच्या वरून हटेनाच. त्याने स्वयंपाक घरात तिला मागून पकडलेच. सुमडीनेही कोणता प्रतिकार केला नाही. सुमितला त्या दिवशी सुमडी अगदी अलगद मिळून गेली. पुढे कित्येक दिवस तो मिळवत होता. पिदाडे नवरे आणि रोज मार खाणार्या बायका कदाचित प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करत असतील पण सुमितचा तर हा दररोजचा खेळ झाला होता. या गोष्टीला महिना होतं आला होता. दवाखान्याची पूर्ण तयारी झाली होती. आज सर्व टीम येथे येणार होती. त्याच्या रहाण्याची सोयही केली गेली होती. सुमडीचं नशीब पालटवायला कोणी येणार होतं, पण कोण? सुमडीला काय माहित होतं की साहेब आपल्याला सोडणार आहेत. ती तर स्वप्नांच्या हिंदोळ्यावर डुलत होती. आपल्या नवऱ्याला कळाले तर काय होईल याचीही तिला भीती राहिली नव्हती. पण ज्याच्यासाठी ती एवढं कठोर झाली होती. तो बदलणार हे तिच्या गावीही नव्हते. दवाखान्याचा स्टाफ घेऊन एक व्हॅन वस्तीवर दाखल झाली. ज्या ठिकाणी दवाखाना उघडला गेला होता. तेथे त्यांच्या स्वागताची तयारी करून घरणावर जेवढे लोक काम करतात त्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं होतं. ऑफिसरांच्या बायकांनाही बोलावण्यात आले होते. आलेल्या लोकांना फ्रेश होऊन चहा पाण्याची सोय सुमितच्या घरात केली होती. सुमिडीने सगळे पदार्थ अतिशय चांगल्या प्रकारे बनवले होते. घरही छान सजवलं होतं. दवाखान्याच्या लोकांना घेऊन आलेली व्हॅन सुमितच्या घरासमोर आली. सुमडी व समोरील घरातील बायका या लोकांना पाहू लागले. सुमितही बाहेर येऊन थांबला होता. दोन कंपाऊन्डर, दोन नर्स, एक सिस्टर,एक डॉक्टर आले होते. सगळे गाडीतून उतरल्यानंतर शेवटी एक गोरापान हात व पाय गाडीतून बाहेर येताना सर्वांना दिसला. कदाचित तो डॉक्टरचा असावा. अतिशय गोरीपान, सुंदर तरतरीत नाक,लांब मोकळे केस, पंजाबी ड्रेसमध्ये एक मुलगी गाडीतून उतरली. सुमित सहीत सगळे तिला अवाक होऊन पहात होते. सगळे वर आले. सगळ्यांनी सुमितला आपली ओळख करून दिली. शेवटी ती बोलली, “हॅलो, मी डॉक्टर रागिणी. फारचं सुंदर आहे हो हा भाग, डोंगराळ भाग आणि आदिवासी भाग म्हणून हे लोक इकडे यायला तयार नव्हते. पण केलं तयार यांना यायला”. सुमितने हसून स्वागत केले. “चांगलं केलंत तुम्ही सर्वजण इकडे आलात. फार हलाखीची परिस्थिती आहे येथे लोकांची. कितीतरी किलो मीटर पायपीट करत दवाखान्यात जावे लागते. वेळेवर न पोहचल्याने अनेक मृत्यू होतात. हे गरीब आणि अडाणी लोक तांत्रिक मांत्रिक करत बसतात मग. वरून दवाखान्याचा खर्चही परवडत नाही यांना. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या सर्वांची चांगली सोय केली आहे राहायची”. हे बोलत असताना सुमितचे पूर्ण लक्ष डॉक्टरकडेच होतं. डॉक्टरच्या ते लक्षात आले होते. बाकी स्त्रियांपैकी दोघी वयाने लहान होत्या पण त्याही सुमितवर भाळल्या होत्या. चक्रम सुमितच्या तेही लक्षात आले होते. पण सुमितला डॉक्टरवर जास्त लक्ष होतं. पण या वेळेस सुमित डॉक्टरला खेळवणार नव्हता तर तिच्याशी लग्न करायच्या हेतूत होता. त्याला ती पाहता क्षणीच खूप आवडली होती. यावेळी मात्र तो दुसरा विचार करत नव्हता.
सुमित डॉक्टर आल्यापासून शांत झाला होता. कार्यक्रमातही तो शांत होता. तो आता दररोज शांत राहू लागला. पहिले जास्त वेळ बाहेर पडवीत उभा राहून खालील वस्तीतील बायका पहात रहायचा ते आता बंद केले होते. सुमडीकडे पण जास्त लक्ष देत नव्हता. बाहेर जाणेही कमी केलं होतं. डॉक्टरच्या नजरेत आपली चांगली प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तो नेहमी दवाखान्याच्या अवतीभवती फिरत असे. आता दवाखान्यात गर्दी होऊ लागली होती. डॉक्टरशी जास्त बोलणे होतच नव्हते. आजूबाजूच्या खेड्यातील लोक येऊ लागले होते. वस्तीवरील आणि पाडावरील म्हातारी माणसं तर डॉक्टरला बघण्यासाठीच उगीच आजार पणाच नाटकं करून येत असत. एक सिस्टर आणि नर्स ज्या वयाने छोट्या होत्या त्या मात्र सुमित भोवती घुटमळत असत पण तो त्यांना दूरच ठेवे. तो अगोदरचा सुमित राहिला असता तर त्यांना केव्हांच घोळात घेतला असता. पण तो आपली इमेज चांगली बनवण्याच्या व डॉक्टरला इंप्रेस करण्याच्या धडपडीत होता. डॉक्टर हसून बोलण्या शिवाय कुठलाच प्रतिसाद देत नव्हती. डॉक्टरला येऊन दोन महिने झाले होते. सुमितला तिच्या मनाचा ठाव ठिकाणा लागतचं नव्हता. सुमितने आपले प्रयत्न सोडले नव्हते. तिच्या मुंबईला आई वडील व भाऊ शिवाय अजून कोणी असेल याची माहिती त्याला मिळाली नव्हती. डॉक्टरनेही कधी काही स्पष्ट सांगितले नव्हते. आता चुईमुई पण पुढे रहायला आली होती. सुमडीला कामाला पाहून तिच्या छातीत कळ उठली. साहेब आता हिला घोळवतेत वाटतं. राधाची माय का सोडून गेली? आपल्याला काहीतरी करावं लागलं. या विचारात ती होती. सुमडी काम करून गेल्यावर चुईमुई सुमितच्या घरी गेली. कपाळावरील कुंकू सोडलं तर ती अजूनही सुंदर दिसत होती. सुमितला तिला पाहून काहीतरी होऊ लागलं. दोन-तीन महिन्यांपासून त्याने जे नियंत्रण ठेवलं होतं ते डळमळू लागलं. त्याने चुईमुईला जाण्यास सांगू लागला. पण ती जागची हलली नाही. शेवटी सुमितला आपले नियंत्रण सोडावे लागले. थोड्या वेळाने चुईमुई हसत घराबाहेर पडली. सुमित घाबरून बाहेर पहात होता. डॉक्टरने पाहिले तर? पण दुपारी वेळ असल्याने सगळे घरात तर काही धरणावर कामावर होती. अशाच एके दिवशी सकाळी बाहेर व्हरांड्यात सुमित चहा पीत असताना एक मिलट्रीची गाडी येऊन थांबली. त्यातून सत्तावीस वर्षाचा एक तरूण आर्मीचा ड्रेस घालून खाली उतरला. तो डॉक्टरची चौकशी करत होता. सुमितला एकदम झटका बसला. एक तरूण डॉक्टरची चौकशी का करतोय? तो पळतच खाली गेला.
“नमस्कार साहेब, का येणं केलंत. जवळ कुठे मिल्ट्री स्टेशन आहे का? डॉक्टरची तेथे जरूरत आहे का?”
हा हा हा असं हसत ,तो तरूण बोलला, “नो नो सर, तसं काही नाही, आपण कोण?”,
“हाय, मी सुमित, मी चीफ इंजिनिअर आहे. या धरणाचे काम माझ्या देखरेखीखाली होत आहे”. “आपण?”
“मी सागर मोहिते, आर्मी ऑफिसर आहे, मी रागिणीचा होणारा नवरा आहे. कुठे राहते ती?” सुमितच्या हृदयावर कोणी हातोडीचे घाव घालत आहे. असे त्याला वाटत होते. तो काही क्षणासाठी स्तब्ध झाला. तोंडातून आवाजच निघेना.
“मिस्टर, सुमित रागिणीचे घर कुठे आहे, प्लिज सांगाल का?” तेंव्हा कुठे तो भानावर आला. त्याने एका कामगारा सोबत त्याला पाठवून दिले. सुमित बराच वेळ त्याच्या पाठमोर्या देहाला पाहत उभा राहिला. तो नजरेआड झाल्यावर तो मंद पावले टाकत वर आला. तो तडक बाथरूममधे जाऊन नळ चालू केला. त्याचबरोबर त्याचे डोळेही वाहू लागले. कधी नव्हे तो चांगल्या मार्गाने चालून आपलं आयुष्य स्थिर करू पहात होता. सगळे कारनामे बंद करून एका सभ्य माणसासारखा राहू लागला होता. पण त्याने असं काही होईल असा विचार केला नव्हता. तो खूप वेळ बाथरूममध्येच होता. तेवढ्यात बाहेर टेलीफोन वाजू लागला. इच्छा नसतानाही त्याला बाहेर यावे लागले. त्याने नाराजीनेच फोन कानाला लावला, हॅलो म्हणण्या अगोदरच त्याने जे ऐकले त्यामुळे मटकन खाली बसला. त्याला काही वेळ काहीच सुचेना. पण दोन मिनिटाने परिस्थितीचे भान आले आणि त्याने जोरात हंबरडा फोडला. सकाळच्या वातावरणात तो आवाज बराच गुंजला. जवळ जवळ वस्ती वरचे सगळेजण बाहेर आले. सुमडी आणि चुईमुई पळतच वर आल्या. त्यांच्या मागे एक-दोन ऑफिसर, सुमडीचा नवरा व दोन कामगार पळत वर आले. सुमित हॉलमधेच जमिनीवर बसून रडत होता. टेलीफोन लटकत होता. काहीतरी वाईट घडले आहे. हे त्या परिस्थितीवरून दिसत होते. त्या ऑफिसरने सुमितला उठवून वर बसवले. प्यायला पाणी दिले.
“सर काही झाले आहे का? आपण खूप रडताय”.
“दोरगास्वामी, माझा मोठा भाऊ ‘अजित’ ज्याचे लग्न होऊन सहाच महिने झाले होते हो, तो अपघातात गेला.”
“‘अजित’ होतं त्याचं नाव”. हे ऐकून सगळे सुन्न झाले. तोपर्यंत डॉक्टर, नर्स, कंपाउडर, आर्मी ऑफिसर सुमितच्या घरी पोहोचले. त्यांनाही हे कळल्यावर वाईट वाटले. काही वेळ गेल्यानंतर सुमित थोडा शांत झाला. तो कसाबसा तयार झाला आणि मुबंईला जायला निघाला. सुमित रडतच मुंबईत पोहचला. घरी भरपूर गर्दी झाली होती. सुमित सोबत धरणावर काम करणारे पवार साहेबही आले होते. सुमितच घर आणि जमलेले लोक बघून, सुमित कोणी साध्या घरातील व्यक्ती नाही हे ओळखले. पवार साहेबांनी सुमितला पकडून आत नेले. हॉलमध्ये मध्यभागी अजितचे पार्थिव देह ठेवला गेला होता. पवारसाहेब तर हॉलची सजावट व श्रीमंती पाहून अवाकच झाले होते. एवढ्या श्रीमंत घरचा मुलगा मग नोकरी का करतोय, तेही तसल्या आडवळणी जंगली व आदिवासी भागात. जेथे कुठल्याही सोयी नसताना. सुमितला बघून त्याची आई आणि बहीण खूप रडायला लागल्या. ममता तर दगडासारखे स्तब्ध बसून होती. ती रडतच नव्हती. तिला रडवणे जरूरीचे होते. आईला व बहिणीला भेटल्यावर तो ममताकडे गेला. “ममता भैया गेलाय या जगातून हे तू मान्य कर. लवकर शुद्धीवर ये थोड्या वेळात त्याला घेऊन जातील गं. तुला मग त्याला पाहताही येणार नाही आणि तुझ्या मनातील दु:ख व्यक्त करून रडताही येणार नाही. भानावर ये ममता”, असं म्हणून सुमितने तिला गदगदा हलवले. ममता भानावर आली आणि सुमितच्या गळ्यात पडून धाय मोलून रडू लागली. तिची अवस्था बघून सुमितलाही रडू येऊ लागले. थोड्या वेळाने ती थोडी शांत झाली. तिची आई, भाऊ तिला सांभाळू लागले. सुमित बाबांना शोधत होता. बाबा कोपर्यात बसून रडत होते. ममताचे वडील व अजून एक मित्र त्यांना सांत्वन देत होते. सुमित बाबांच्या जवळ गेला आणि खांद्यावर हात ठेवला. बाबाने मान वर करून पाहिले. सुमित दिसताच त्याच्या पायाला कवटाळून रडू लागले. सुमित हळूच खाली बसला आणि बाबाला घट्ट कवटाळून सांत्वन करू लागला. बाबांना ही शाश्वती देऊ लागला की दादाला परत आणू शकत नाही पण मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. दहा दिवस राहून सगळ्या दिवसांचे क्रियाकर्म करून तो निघाला. आई बाबांचे मत झाले की त्याने नोकरी सोडावी व घरचा बिझनेस सांभाळावा. सुमित यासाठी हो म्हणाला. पण इतक्यात नोकरी सोडता येणार नाही. धरणाचे काम अजून अपूर्ण आहे. सात-आठ महिने लागतील पूर्ण व्हायला. त्याला असं मधेच सोडता येणार नाही. पण धरणाचे काम पूर्ण झाले की तो नक्की सोडून येईल. वडिलांनी आमदार, खासदार, मंत्री सगळ्यांशी बोलून घेतले. त्याचेही हेच मत होते. शेवटी सुमित जड अंत:करणाने जायला निघाला. बाबा खूप थकल्या सारखे वाटत होते. गाडीत बसताना आपण नोकरी सोडून यायचं हे सुमितने ठरवले. इकडे आल्यावरही सुमित शांत शांतच होता. डॉक्टर व अनेक जण भेटून गेले. डॉक्टरचेही कळाल्यापासून तो दु:खी होताच. चुईमुई व सुमडी अधूनमधून त्याच्यासोबत असायच्या. त्यांच्याशी तो सबंध ठेवून होता पण जीवनात रस नसल्या सारखा. पाच महिने उलटून गेले. सुमितने आईला सांगितले की, “वहिनीला इकडे फिरायला पाठवून दे. नाहीतर सर्वजण इकडे या. डोंगराळ सुंदर प्रदेश आहे. थोडं तिचं मन लागेल. घरातून बाहेर पडली तर ती सावरली जाईल”. सुमितच्या आई-वडिलांनी कामामुळे यायला नकार दिला. पण वहिनीला त्याच्याकडे पंधरा दिवसांसाठी पाठवून दिले.
सुमित ममता येणार म्हणून सगळी आवराआवर करून घेत होता. सुमडी आणि चुईमुई पासून लांबच राहत होता. ममता इथं आल्यावर गैर वाटू नये म्हणून. त्या दोघींना समजावून पण ठेवले होते. सुमितला ममता राहीपर्यंत खूप व्यवस्थित राहवे लागणार होते. सांभाळून वागावे लागणार होते. तसा तो मुख्य ऑफिसर असल्याने त्याच्या बद्दल काही बोलले नसते. तरीही काळजी घ्यावी लागणार होती. ममता चार तारखेला सुमितकडे आली. अतिशय सुंदर गाडी सुमितच्या दारासमोर येऊन थांबली. ममता पांढऱ्याशुभ्र साडीत डोक्यावरून पदर घेऊन खाली उतरली. ममता अजूनही अशाच कपड्यात राहते बघून सुमितला खूप वाईट वाटले. सुमितने ममताला घरात आणले. ड्रायव्हरने सर्व सामान आत ठेवले. सुमडीने त्यांचे स्वागत केले. एखाद्या काळ्या पाषाणात मुर्ती कोरल्या सारखी स्त्री बघून ममता बघतचं राहिली. सुमडी, का बघताजी ताई माझ्याकडं.काई लागलंय का. ममता, थोडं हसून, नाही अगं तू किती सुंदर आहेस ते पहात होते. अय्यो ऽऽ म्हणत सुमडी आत पळाली. खरं तर सुमित आणि ड्रायव्हर पण सुमडीला निरखून पाहत होते. ममता येणार म्हणून सांगितल्याने सुमडीने त्या दिवशीचा आदिवासी पेहराव केला होता. तिचे अर्धवट कपडे आणि भरलेलं शरीर पाहून तिच्या मनात सुमित बद्दल मनात शंकेची पाल चुकचुकली. ती सुमितवर लक्ष ठेवू लागली. पण सुमित शांत आणि संयमी राहत असल्यामुळे तिला काही दिसून आले नाही. ममता येथे आल्यावर खूश झाली. येथील वेगळं वातावरण व निसर्गसौंदर्य बघून काही काळा पुरत का होईना. ती स्वत: ला आपण कोण आहोत हे विसरून गेली होती. दु:ख पण विसरून गेली होती. सुमितने सगळ्यांना सांगून ठेवले होते की कोणीही त्याच्या भावाच्या मृत्युबद्दल तिच्याशी बोलणार नाही. ममताचा येथे छान वेळ जात होता. ती दिवसा कधी कधी शाळेत वा दवाखान्यात जाऊन बसे. तिथल्या बायकांची आपुलकीने चौकशी करत असे. त्यांच्या समस्या सुमितला सांगत असे. सुमित बद्दल ऐवढं चांगले ऐकून ती खूप आनंदली होती. ती नेहमी सासूबाईंना हे सांगत असे. सुमितची आई मुलाचं कौतुक ऐकून भारावून जात असे. आपला मुलगा इतका बदलला याचे नवल वाटत असे. ममता मात्र सुमित पासून चार हात दूरच राहत असे. एक तर त्याने सुरवातीला धोका दिला होता. दुसरे म्हणजे येताना सुमितच्या आईने सांगितलेल लक्षात ठेवलं होतं. “हे बघ ममता तू आम्हाला आमच्या मुलीसारखीच आहेस पण सांभाळून रहा. खरंतर सायली इथे असती तर परदेशात गेलेली नसती तर तिला तुझ्यासोबत पाठवलं असतं. पण ते जमलं नाही. आम्ही पण कामामुळे येऊ शकत नाही. पण तू सांभाळून रहा. तू विधवा आहेस आणि लोक त्याच नजरेने तुझ्याकडे पाहणार. त्यातच तू तरुण आहेस फायदा घ्यायचा प्रयत्न करतील. तुझा पाय घसरला तर तुला कलंक लागेल. पहिले वेगळे होते बेटा पण आता परिस्थिती वेगळी आहे. सुमित जरी माझा मुलगा असला तरी तो पुरुष आहे. तिथे दोघंच राहणार सांभाळून रहा”. सुमितच्या आईचे ते बोल ममताने आपल्या मनात कोरून ठेवले होते. त्यामुळे ती सुमित बरोबर जास्त मोकळेपणे वागत नव्हती. ममताने तेथील परिसर सुमित बरोबर फिरून पाहिला होता. मुबंईहून येताना तिने ड्रांईंग पेपर आणले होते. ते मनातील चित्रे ती कागदावर रेखाटत होती. सुमितनेही तिला वाचण्यासाठी कथासंग्रह आणून दिले होते. त्यामुळे ममताचा बराच वेळ छान जात होता. एके दिवशी ममताने रात्री जेवण झाल्यावर हळूच विषय काढला. “हे बघ सुमित तू शहरात कसंही वागलास तरी चालते. पण हे खेडेगाव आहे. वरून आदिवासी भाग, चुईमुई, सुमडी आणि राधा बद्दल मला कळाले. सुमडीनेच सांगितले, आधी सांगायला तयार नव्हती पण तुझी शपथ दिल्यावर सांगितले. अरे, राधा गेली पण तू चुईमुई आणि सुमडी बरोबर सबंध ठेवून आहेस. चुईमुई विधवा तर सुमडी नवरा असलेली. दोघींच्या बाबतीत जर काही गैर घडलं तर तुमची बदनामी तर होईलचं. पण सुमडीचा नवरा तर मारायला येईल. सुमडीला सोडून देईल. चुईमुई तर विधवा तिच्या बाबतीत गैर झाले तर तुला तिच्याशी लग्न करावे लागेल, चालेल का ते. सुमित काही उत्तर न देता खाली पहात बसला. बघ विचार कर, तुला हवं असेल तर मी आईशी बोलते, तुझं लग्न करून देऊ. पण असं वागणं बरं नाही”. सुमित मान हलवून रुममध्ये निघून गेला. त्यानंतर दोन दिवस त्याने ममताला नजर द्यायला पण धजेना.
ममताला येऊन बारा तेरा दिवस होतं आलेले होते. सुमितची आई तिला आता परत ये म्हणत होती. पुढच्या दोन दिवसांत ममता परत जाणार होती. सामानाची आवरा आवर चालली होती. तसेच सुमडीला सुमितच्या घराच्या आवरा आवर बाबत सूचनाही देत होती. सगळं काम आवरून जेव्हा ममता लहान मुलांच्या शाळेकडे गेली आणि त्या मुलांशी खेळण्यात व गप्पा मारण्यात रमली तेव्हा सुमित वरून तिला खिडकीतून पहात होता. सुमडी सुमितला म्हणाली,
“काय पहाताय साहेब, ममता मॅडम लई भारी सुंदर हाईत ना.
हं, अं, नाही, मी ते पहात नव्हतो. एवढ्या लहान वयात ती विधवा झाली. मुलंबाळं खेळवायचं तिचं स्वप्न स्वप्नच राहिले. मी पण खूप चुकलो तिच्या बाबतीत एवढी चांगल्या मुलीला मी खेळवून सोडून दिलो. तिचं आयुष्य वाटोळं केलं. नशीब भावाशी लग्न झाले तर परत हे नशीबात आलं. मीच जबाबदार आहे तिच्या या अवस्थेला. मीच लग्न केले असते तिच्याशी तर असं काही घडलं नसतं बहुतेक”.
“मग आता करा की साहेब त्यांच्याशी लग्न, मुलंबाळं नाही. वयपण लहान हाय. कशा राहतील असं आयुष्यभर. तुमचं लग्न झाले आणि आई वडिलांच्या माघारी कोणी नको का बघाया. एकट्या बाईने जगणं लई अवघड बघा. वरून जगाच्या नजरा हापापलेल्या. त्यांच्यासंग कधी विपरीत घडलं तर होत्याच नव्हतं होईल”.
“काय, मी करू लग्न, ती माझी वहिनी आहे. असं कसं करता येईल?”.
“अहो साहेब ती वहिनी होती, पण आता भाऊ नाही राहिला. तुम्ही नाही करणार लग्न तर मग दुसरा कोणी शोधून करा त्यांचं करा लग्न. तुम्ही शिकलेले हाव म्हणून म्हणले साहेब, रागात येऊ नका”.
“नाही,पण माझे आई-वडील यांच्यासाठी तयार होणार नाहीत”.
“साहेब, तुम्हालाच समजवावं लागेल त्यांना बघा”. सुमडी बोलून कामाला गेली पण सुमित खूप वेळ यावर विचार करत होता. पुढच्या वेळेस गेलं की आई बाबांशी बोलायचं हे ठरवलं. तेवढ्यात ढग जमू लागले, गडगडाट सुरू झाला. ममताला त्याने वर बोलावलं. तीन-चार वाजेपर्यंत छोट्या मोठ्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. अवकाळी पाऊस बेभरवशाचा. पण संध्याकाळी जास्तच ढग भरून आले. सुमित व इतर लोकांना काळजी वाटू लागली. धरणाच काम अजून दीड महिन्यात पूर्ण होणार होतं. पण धरणाकडे आताच पाणी येणं धोक्याचे होते. रात्री जर पाऊस वाढला तर पाणी वाढून धरणाची भिंत पाडू शकते. सुमित धावतच पावसात ऑफिसकडे पळाला. जाताना ममताला सांगून गेला की त्याला यायला उशीर झाला तर
“जेवून घे. दरवाजा चांगला लावून घे. तो चावीने उघडेल दरवाजा. कोणी आले तर खिडकीतून पहा. पावसाचं कुठे जाऊ नको”. तो धरणाकडे निघून गेला. धरणाकडे येणार्या पाण्याला दुसरीकडे वाट करून देणं महत्त्वाचं होतं. सगळे ऑफिसर आणि कामगार पावसात कामाला लागले. लवकरच अंधार पडणार होता. लाईटच्या उजेडात काम सुरू झाले. रात्रीचे दहा वाजत आले. पाऊस वाढला होता. वारे सुटले होते. ममताला सुमितची काळजी वाटतं होती. या दुर्गम भागात मोबाईल तर चालतच नव्हते. टेलीफोन कसा बसा चालायचा. तिने ऑफिसवर फोन लावला पण तोही पावसामुळे चालेना. तिने कसेतरी थोडेसे खाऊन घेतले. अकरा वाजले तिला झोप येऊ लागली. पण घाबरून व चितेने डोळा लागेना. ती आत खोलीत गेली आणि पुस्तक वाचत पडली आणि कधी तिचा डोळा लागला तिलाच कळलं नाही.
सगळं काम संपवून सुमितला यायला रात्रीचा दीड वाजला होता. रेनकोट घालूनही तो पूर्णपणे भिजला होता. व्हंराड्यातून जात असताना ममताच्या खिडकीचा पडदा उडताना त्याने पाहिले. थंडगार हवा येत होती. तो खिडकी बंद करायला गेला तर खोलीत लाईट चालूच राहिली होती. ममताच्या हातातील पुस्तक बाजूला गळून पडले होते. साडी गुडघ्यापर्यंत हवेने वर सरकली होती. केस खुले सुटले होते. काही गोऱ्यापान चेहर्यावर चिटकले होते. अशा अवस्थेतही ती अतिशय सुंदर दिसत होती. सुमितने पटकन खिडकी बंद केली आणि आत निघून गेला. हातपाय चिखलात भरले असल्याने त्याने ते धुतले. गरम चहा करून पिला आणि खोलीत जाऊन झोपला. पण झोप येईना. डोळे बंद केले तर ममताचे ते रुप डोळ्यासमोर येऊ लागले. तो चल बिचल झाला. तो परत उठून व्हरांड्यात गेला आणि ममताची खिडकी उघडून आत पाहू लागला. ममताचे गोरेपान पाय त्याला आकर्षीत करू लागले. त्याचा तोल ढळू लागला पण त्याने परत खिडकी बंद केली आणि खोलीत जाऊन पडला. आता तर त्याचा डोळाच लागेना. तो अर्धातास तडफडत बसला. आपण जो विचार करतोय तो चुकीचा आहे. ती आपली वहिनी आहे. एक मन म्हणत होते तर दुसरे पण आता भाऊ कुठे जिवंत आहे. शेवटी दुर्बल मन त्यावर हावी झाले. तो उठला आणि ममताच्या खोलीकडे गेला. रोज दरवाजा लावून झोपणारी ममता वाट पाहत तसेच झोपी गेली होती. सुमितने दरवाजा ढकलला. तो सहज उघडला गेला. तो आत जाऊन खूप वेळ ममताला पहात बसला. मग हळूहळू त्याचे हात ममताच्या पायावर फिरू लागले. झोपतल्या ममताला काही वेळ कळाले नाही पण थोड्या वेळात ती जागी झाली. ती सुमितला रागवू लागली, विनवू लागली, तो जे करतोय ते चुकीचे आहे. “सुमित काय करतोस हे. मी तुझी वहिनी आहे. चुकीचे आहे हे, मी एक विधवा आहे. तू काही केलंस तर जगात तोंड दाखवायला मला जागा राहणार नाही. तुला परवाच ऐवढं समजावून सांगितले आणि आज परत तीच चूक करतो आहेस, तेही माझ्या सोबत. सोड सुमित मला” ती त्याला धक्के देऊ लागली. पण सुमित वेगळ्याच धुंदीत होता. तो ऐकेना, “हे बघ ममता मला माहीत आहे हे चुकीचे आहे. पण अगोदरही मी तुला कितीदा कवेत घेतले आहे आणि चुंबनही घेतले आहे”. “हे बघ सुमित ते वेगळं होतं. हे वेगळं आहे. ते प्रेमापोटी केलं होतं पण आपण कधी चुकीचं वागलं नव्हतो. हे पाप आहे आणि चुकीचे आहे”. पण सुमित कुठे ऐकतोय, लाख विनवण्या केल्यातरी त्याने शेवटी करायचे तेचं केलं...
काही वेळाने सगळं शांत झालं आणि सुमित ममताच्या रडण्याने भानावर आला. आपण काय करून बसलो हे त्याला कळलं. तो ममताच्या पाया पडून माफी मागू लागला. ममता माफ करेना तेव्हा तो उठून खोलीत निघून गेला. खुर्चीत बसून भावाची माफी मागत रडू लागला. तेथेच तो झोपी गेला. पण ममता झोपली नाही. रात्रभर तिने रडून घालवली. सकाळी उठून ती तयार झाली आणि मुंबईला जायला निघाली. सुमितला उठवून गाडीची सोय करायला सांगितली. सुमितने परत तिच्या पायापडून माफी मागितली पण ती मागे सरकली. ममता सकाळी सकाळी निघून गेली. जाताना तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. सुमडीला काहीतरी नवीन घडल्याचे जाणवले. ताई काल काहीच म्हणाल्या नाहीत आणि आज अशा अचानक निघून गेल्या. त्याही अशा पावसात. सुमडी सुमितच्या घरी आली तर सुमित स्पुंदून स्पुंदून रडत होता. सुमडी रागातच त्याच्याजवळ गेली, “साहेब, खूप चुकीचं वागलात वहिनी साहेबांसंग, आमच्या तर भावनांशी खेळलात पण ती तर तुमच्या भावाची बायको होती, वरून ती विधवा, वाटुळं केलं बघा तुम्ही त्यांचं. काही बरं वाईट घडलं तर काय करणार हाईता”. “मी चुकलो गऽ सुमडी,ती खूप नको नको म्हणत होती पण मीच ऐकलं नाही. मी जेव्हा इथून जाईन ना, आई-बाबांना बोलून तिच्याशी लग्न करेन”. ममता निघून गेल्यावर सुमित पश्चातापाने खूप वेळ रडला. पण काही वेळाने तो भानावर आला. तो घाबरून थरथरू लागला. ममता जेव्हा मुबंईला पोहचेल. आई बाबांना सगळे सांगेल तेंव्हा त्यांना काय वाटेल. आताच त्यांचा माझ्यावर विश्वास बसत होता. त्यात मी हे कांड केलं. तेही स्वत: च्या वहिनी सोबत, काय तोंड दाखवू त्यांना. माझं चुकलं, माझ्या हातून पाप घडलं. इकडे ममता गाडीत खूप रडत होती. काय सांगू कुणाला? आई वडिलांना दीराने आपली इज्जत लुटली की सासूबाईंना सांगू, मी माझी इज्जत सांभाळू शकले नाही. आताच त्यांना मुलाच्या मृत्युचा धक्का बसलेला आहे. मी दुसर्या मुला बद्दल सांगितलं तर मामंजी तर वाचणारचं नाहीत, मलाच गप्प बसावे लागेल. पण कसं सहन करू हे ह्या विचाराने व रात्रभर जाग्रणाने ममताचे डोके दुखू लागले. दहा तास प्रवास करून ममता मुंबईत पोहचली. पोहचता पोहचता रात्र झाली. थकल्याने डोके दुखतंय हा बहाणा करून ती खोलीत निघून गेली. जेवायलाही आली नाही. सुमितच्या आईला काही वेगळेच वाटले. ती काही न सांगता अशी अचानक का निघून आली. तिने सुमीतला फोन लावला. फोन उचलायला सुमित घाबरू लागला. त्याची छाती धडधडू लागली. त्याने कसा तरी फोन उचलला. “कसा आहेस सुमित, ममता अशी अचानक का निघून आली. तिला काही झालंय का? तिथे काही घडलंय का? तू काही केलंस का तिच्या बरोबर, भांडलास का? तिला कोणी काही बोललंय का? तिचे डोळे रडल्यासारखे वाटत आहेत”. एवढया सगळ्या प्रश्नांची उत्तरे तो कसा देणार होता. “तू काही केलंस का तिला?” या प्रश्नाने तर तो गडबडला. पण त्याच्या लक्षात आले की ममताने अजून काही सांगितले नाही. तो एवढंच म्हणाला, “नाही, काही घडलं नाही. काय झाले ते त्यालाही माहीत नाही”. थोडं जुजबी बोलून फोन ठेवून दिला. पण त्याला रात्रभर झोप आली नाही. तो पुढचे तीन चार दिवस बैचेन होता पण घरुन काही फोन आला नाही. ममता आता थोडी ठीक होती हे आईकडून कळाले. ती सध्या माहेरी गेलेली आहे एवढं कळाले. त्याने ममताची माफी मागण्यासाठी खूप फोन केले पण तिने ते उचलले नाहीत. हळूहळू सुमितही नॉर्मल झाला. ममता आता काही सांगणार नाही असं वाटून तो निश्चित झाला. पण त्याच दैव एवढं बलवत्तर नव्हतं. एक नवीनच संकट त्याच्यासमोर येऊन उभा टाकणार होतं. ज्या पाऊलखुणांवर पाऊल ठेवून सुमितला जगायला पाहिजे होते, वडिलांसारखा आदर्श निर्माण केला पाहिजे तेथे त्याचे पाऊल वाकड्या मार्गाने चालून गेले होते. भरकटले गेले होते. इतके दिवस बाहेर होते पण आता आपल्याच खानदानाला बट्टा लावण्याचे काम केले होते. तो आता शांत असला तरी आतून त्याचे मन त्याला खात होते. कधी काही घडेल या भीतीने तो सतत चलबिचल होत असे.
बघता बघता एक महिना उलटून गेला. ममताने अजून काही माहेरी वा सासरी सांगितले नव्हते. सुमडी वा चुईमुई यांना सुमित आता बघतही नव्हता. इतर कुठेही जात नव्हता. चुकीचे पडलेले पाऊल आता तो सरळ करू पहात होता. त्याचे धरणावरचे काम संपत आले होते. वडिलांना दिलेल्या वचनानुसार तो नोकरी सोडून मुंबईला परत जाऊन वडिलांचा बिझनेस सांभाळणार होता. पण तेच सुमितला नको वाटतं होते. डॉक्टरनीनेही लग्न केले होते. बाकीचे सगळं व्यवस्थित चालू होते. एके दिवशी अचानक सुमितच्या आईचा सुमितला तातडीने मुंबईला येण्यासाठी फोन आला. इथे काय घडलं आहे ती येथे आल्यावरच सांगेन म्हणाली. सुमितला नाइलाजाने जावे लागणार होते. गाडीत तो घाबरूनच बसला होता. त्याला वाटत होते की ममताने तिच्या आईला वा त्याच्या आईला काही तरी सांगितले असेल. सुमित मुंबईत घरी पोहचला तेव्हा घरी ममताचे आई वडील, भाऊ बहीण तर सुमितचे आई वडील व बहीण एकत्र जमले होते. सगळे कसल्यातरी टेन्शनमध्ये बसले होते. ममता रडत होती. सुमातची आई चिडलेली व रागात दिसत होती. “बघ सुमित बघ हिला, काय दिवे लावलेत हिने. अरे ही गरोदर आहे. हिला दिवस गेलेत. कुठे तोंड काळे करून आली काही माहिती नाही. कोण आहे या बाळाचा बाप म्हणून विचारले तर काही सांगत नाही. फक्त रडत आहे. तिच्या आई वडील यांना व आम्हाला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही हिने. हिला लाज कशी वाटली नाही, आपली लाज वेशीवर टांगताना. थोडातरी आपल्या घराण्याचा विचार करायची होती. नवरा मरून आठ महिने झाले नाहीत आणि हिने असे गुण उधळलेत. तुलातरी माहित आहे का? कोण आहे तो. तुझ्याकडेच आल्यावर हे घडले आहे. हिला मी कुठेही पाठवत नव्हते यासाठी. विधवा आहे न ही. अशी वागली, हिला एवढंच वाटत होतं तर सांगायचं न आम्हाला हिच दुसरं लग्न लावून दिलं असतं. पण असं शेण खाऊन आली. कुठल्या बदमाशाच आणि भिकार्याचं पोर आहे हिच्या पोटात?” एवढा वेळ गप्प बसलेला सुमित आपल्या बाळाला बोल लावलेल पाहून हादरला.
“आई, काहीही काय बोलतेस हे. हे बाळ माझं आहे.”
“काय तुम्ही दोघांनी शेण खाल्लात. लाज नाही वाटली तुम्हाला”, आई बोलली.
“आई याच्यात ममताची काही चूक नाही, मी तिच्यावर बळजबरी केली”. तेवढ्यात सुमितच्या तोंडात ममताच्या आईची चपराक बसली. ताड...
“हो काकू माझं चुकलं, मी असं करायला नको होतं. पण मी माझ्यावर काबू ठेवू शकलो नाही. ममता खूप वेळा विरोध करत होती. नको म्हणत होती. ढकलून देत होती पण तिची शक्ती कमी पडली. तिच्या पोटात माझं बाळ आहे. मी ममताशी लग्न करणार आहे. तिला व बाळाला माझं नाव देणारं आहे. ती विधवा असो वा कशीही. ती माझ्या बाळाची आई आहे”. आतापर्यंत शांत असलेले रावसाहेब उठले.
“सुमित तू खूप मोठी चूक केलीस पण आज तू चुक सुधारून ममताला बदनामी पासून वाचवलंस. तुझी ही चूक माफीच्या लायकीची नाही. पण आपल्या घरचा वारस येणार आहे म्हणून मी शांत राहतोय”. आता वातावरण थोडे निवळले होते. ममता सुमितच्या गळ्यात पडून रडत होती. तेवढ्यात सायली ममताला म्हणाली, “ममता तुला आई कालपासून विचारत होती, ओरडत होती, नाही नाही ते घाणेरडे आरोप करत होती. मग तू का नाही सांगितलंस. सुमितने तुझ्यासोबत असं केलं म्हणून”. “त्याला दोन कारणे होती. एक आईंनी माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवला नसता. दुसरं सुमित स्वत: हून हे मान्य केला नसता. आई बाबांच्या नजरेत तो पडून गेला असता. त्याला त्याच्या चुकीची जाणीव होऊन तो आपली चूक कबूल केली. यापुढे तो कधीही वाकडं वागणार नाही. त्याच पाऊल कधी वाकडं पडणार नाही”. दुसऱ्या दिवशी कोर्टात सुमित आणि ममताचे लग्न लावण्यात आले. दुसऱ्या दिवशी सुमित ममताला घेऊन परत धरणाच्या राहिलेल्या कामासाठी कोरीला परत निघाला. जिथे पाऊल चुकले तेथेच ममताला आपली बायको म्हणून सन्मानाने घेऊन जात होता. सुमितने आपल्या वहिनीशी लग्न केले हे पाहून सगळ्यांना त्याचा अभिमान वाटला. सुमडी, चुईमुई व राधाच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटले होते. एका डोळ्यात सुमितने चांगले केले म्हणून तर दुसऱ्या डोळ्यात तो आपल्या पासून दुरावला म्हणून. धरणाचं काम आटोपून सुमित कायमचं मुंबईला निघून गेला. जुन्या पाऊलखुणा पुसून नवीन पाऊलखुणा निर्माण करायला...
लेखिका - सौ हेमा येणेगूरे, पुणे
0 टिप्पण्या