
शोभीवंत
मी वागतो कसाही माझी न खंत आहे
अन्,हर ऋतूत लपला माझा वसंत आहे.
चोरून भेट सजणी केव्हा कधी कुठेही
या रूक्ष भावनांना आता उसंत आहे.
बोलून खूप झाले संवाद खूप झाला
जवळून तुज पहाणे मजला पसंत आहे.
शाबूत ठेवतो मी माझे अबोल मी पण
अन् कोण भेटलेला माणूस संत आहे.
रंगात मी हव्या त्या रंगून जात आहे
माझे चरित्र इतके का शोभिवंत आहे.
- वैभव चौगुले, सांगली
चोरून भेट सजणी केव्हा कधी कुठेही
या रूक्ष भावनांना आता उसंत आहे.
बोलून खूप झाले संवाद खूप झाला
जवळून तुज पहाणे मजला पसंत आहे.
शाबूत ठेवतो मी माझे अबोल मी पण
अन् कोण भेटलेला माणूस संत आहे.
रंगात मी हव्या त्या रंगून जात आहे
माझे चरित्र इतके का शोभिवंत आहे.
- वैभव चौगुले, सांगली
९९ २३ १० २६ ६४
0 टिप्पण्या