Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

चांगले कर्म करा | लेख | अंकुश शिंगाडे

changale karm kara, Marathi articles 'do good deeds'
चांगले कर्म करा याविषयीचा अंकुश शिंगाडे यांचा मराठी वैचारिक लेख 
चांगले कर्म करा ǀ सत्कर्म करा ǀ कर्माचं फळ ǀ मराठी लेख ǀ Do good deeds ǀ Marathi lekh 

आपलं शरीर हे अनेक व्याधींची जननी आहे. या शरीरात नाना प्रकारचे रोग होत असतात. जे रोग शरीराला घातक असतात.

    शरीराला रोग का होतात? असा जर कोणी प्रश्न विचारल्यास त्याचं नेमकं उत्तर आपल्याला सापडतं. ते म्हणजे ताणतणाव. आपण नेहमीच ताणतणावात वावरत असतो.

    माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाला आयुष्यभर टेन्शन असतं. आता म्हणाल की जन्मत: बरोबर कोणतं टेन्शन असतं बाळाला? होय, जन्मत: बरोबरही टेन्शन असतं. कधी भूक लागली आणि आईनं दूध पाजायला वेळ केला तर त्यामुळं सुद्धा येतं लहान बाळाला मानसिक टेन्शन. काही काही काही मुलं नाजायज पैदा होतात तेव्हा त्याची आई त्याला कचऱ्यात फेकून देते. तेही त्या लहान बाळाला टेन्शन. त्यातच काही काही मुलांना जन्मतःच व्याधी असतात. त्यावेळी त्या लहान बाळालाही इंजेक्शनं टोचली जातात. तेव्हा तेही त्या बाळाचं टेन्शन. अलिकडे तर लहान बाळाला शौचालयाची जागाच राहत नाही हेही बाळाचं टेन्शन नाही का? काही काही लोकं बाळाचा गुप्त धनासाठी बळी देतात. हेही टेन्शन नाही का? कधी बाळाला जन्म दिल्यानंतर आईचा मृत्यू होतो. हेही बाळासाठी टेन्शन नाही का? त्यावेळी बाळ अनाथ होते, हळूहळू बाळ मोठं होतं. त्यावेळी त्याला त्याची आई मरण पावल्यास खंत असते व अगदी लहानपणापासूनच त्याला अनाथाचं जीवन जगावं लागतं. बाप दुसरा विवाह करुन मोकळा होतो. कधीकधी काही मुलांचे तर मायबाप दोघंही मरण पावतात तेव्हा तर त्यांचं जीवन अगदी असह्य असतं.

    आज सरकार शाळेच्या माध्यमातून सांगत असतं की ताणतणावरहित रहा. परंतु अशी मुलं कशी ताणतणावरहित राहतील. कोणी कितीही अशा मुलांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला तरी त्या मुलांचं दुःख कोणीच दूर करू शकत नाही. आपलं दुःख आपल्यालाच दूर करावं लागतं. दु:खाबाबत सांगायचं झाल्यास दुःख येण्याला भाग्याची जोड असते असं म्हातारी माणसं म्हणत होती. कोणी म्हणायचे की पूर्व जन्मात आपण पाप केलं असेल, म्हणून आपल्याला त्याचे भोग म्हणून असे दिवस पहायला मिळाले. परंतु भाग्याला आजचा काळ मानत नसल्यानं ते पूर्वजन्माचं पापपुण्य समजता येत नाही. परंतु एका अर्थानं विचार केल्यास ज्या वेळी माता जन्म दिल्यानंतर बाळाला फेकून देते. हे फेकून देताना ज्या बाळाला ती फेकून देते, त्या बाळाचा कोणता दोष असतो? ह्याला पूर्वजन्माचं पाप म्हणता येऊ शकते. कारण कदाचित मागील जन्मात त्याच आईला तिचा जन्म झाल्यानंतर त्या बाळानं फेकून दिलं असेल हे नाकारता येत नाही.

    आजकाल जन्म घेताना काही काही मुलांचा जन्म अशा ठिकाणी होतो की त्या ठिकाणी धड बाळाला पोटभर खायला मिळत नाही. तसेच काही काही बाळाचा जन्म अशा ठिकाणी होतो की ज्याच्या पायाशी सुख लोटांगण घेत असतं. ह्याला काय समजावं? त्याला पूर्व जन्माचं पापपुण्य समजता येत नाही तर काय?

    अलिकडे कोरोनाच्या काळात हाच अनुभव आला. काही काही काही माणसं धडधाकट असूनही तसेच ती उत्तम प्रकारची काळजी घेऊनही ती कोरोनानं मरण पावली. अन् काही काही माणसं धडधाकट नसूनही व कोणत्याही प्रकारची काळजी न घेऊनही जगत आहेत. यालाही पापपुण्य समजता नाही येऊ शकत काय? हे आपलं पापपुण्यच आहे. परंतु जो मानेल किंवा समजेल. त्याला ते पापपुण्य कळेल.

    महत्त्वाचं म्हणजे आपले चांगले कर्म आपल्याला चांगलं फळ देऊ शकतात. तसेच आपले वाईट कर्मच आपल्याला वाईट कर्म प्रदान करतात. कोणी म्हणतात की आपण जे कर्म करतो. त्याचे फळ त्याच जन्मात प्राप्त होत असते. कारण असा जन्म वा पुनर्जन्म कोणीही पाहिलेला नाही. परंतु हे जरी खरं असलं तरी पुनर्जन्म नाही असं म्हणता येत नाही वा मानता येत नाही. पुनर्जन्म असेल व जे पापकर्म वा पुण्यकर्म या जन्मात भोगता आलं नसेल, ते भोगायला दुसरा जन्म नक्कीच मिळत असेल. म्हणून चांगले कर्म करा व चांगले फळ चाखायला दुसरा जन्म घेऊन अवश्य या. कारण आपण जे बीजारोपण करू तेच फळ आपल्याला चाखायला मिळेल. आंब्याच्या झाडाला कधीच संत्री लागणार नाहीत. तसंच कर्माचंही आहे. त्यामुळं वाईट कर्माचं रुपांतरण कधीच चांगल्या कर्मात होणार नाही. वाईट कर्माचं फलित वाईटच निघेल आणि चांगल्या कर्माचं फलित चांगलं. मग कितीही जन्म घेतले तरी कर्माचं फळ कधीच बदलणार नाही आणि हीच सत्य गोष्ट आहे वस्तुस्थितीला धरून आणि ही सत्य बाब कधीच नाकारता येत नाही.

    - अंकुश शिंगाडे, नागपूर
      मो.नं. ९३७३३५९४५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या