
अनमोल | Precious love
न आभाळ काळे झालेन मेघ दाटून आले
हे फक्त तुझेच नयन होते
जे तुला भाळून आले
डोकं करेना काम काही
फक्त तुलाच पाहत राही
जगाने केला गाजावाजा
आपल्या प्रीतीचा फुलबाजा
संगतीत सजणीच्या
मधाळ झालो मी
तू आली अशी जवळ
गहाळ झालो मी
स्वतःच्या नजरेतून बघ
सौभाग्यवती आहेस तू
दुसऱ्याच्या नजरेतून बघशील
तर सदैव रिती आहेस तू
अगं सोल आहे
नव्हे खोल आहे
आपलं प्रेम हे
अनमोल आहे !!
-रहेमान पठाण,
मो.नं. ८८८८७२४९६०
0 टिप्पण्या