Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

शिडकाव्याच्या लाटा | निसर्ग कविता | प्रमोद मोहिते

shidkavyachya lata nisarg kavita              

                शिडकाव्याच्या लाटा 

[Shidkavyachya Lata | Nisarg Kavita | Pavasachi Marathi kavita]

    रपरप पडतो झिम्मड घालितो पाऊस हा झडीचा
    थरथर कापे गोठ्यात कपिला गारठा हुडहुडीचा.

    जिकडे तिकडे पाणीच पाणी पाण्यात कोसळे दरड.
    दुथडी भरुनी नदी वाहते फिरत्या लाटांची ओरड.

    तोल सावरुनी कुणी चालला चिकचिक चिखलांतुनी
    पाय घसरुनी पडे पालथा धपकन् बांधावरुनी.

    गिरक्या मारी गिरी शिखरांवरी रानवारा चहूकडे
    हिरव्या हिरव्या कड्याकड्यांतून पाऊस हा धडपडे.

    शेतमळ्यांतून समढम पाणी जाहली शेतांची तळी
    कुजले अंकुर ओला हा दुष्काळ उदास व्याकूळ बळी.

    झुला नभाचा झरझर झरता अंगावरती काटा
    डोळ्यांपुढती भिरभिर उसळती शिडकाव्याच्या लाटा!!

        - प्रमोद मोहिते
        मो.नं. ९५ ६१ ७०० ८००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या