
मराठी प्रेम चारोळ्या | Marathi charolaya on love | Marathi charolisangrah
तुझ्यासाठीच जपून ठेवलेत
आनंदाचे सारे क्षण
जिवापाड जपेन तुला
तू फक्त हो म्हण...
खळी पाहता गालावरची
तुझ्या प्रितीचा लागे लळा...
केस विखुरले डोळ्यांवरती
दिसू लागली नाद खुळा...
मला रोज छळायची
तिची वाईट खोड
पण रागवणार कसा?
ती हसतेच खूप गोड.
ती म्हणाली सुखी रहा
मला घरचं बंधन आहे
पण तिच्या सुखासाठीच
माझं आयुष्य आंदण आहे.
पावसाची ओली सर
नेहमीचं गळकं घर
आधी मी ओंजळ धरतो
नंतर तू ओंजळ धर.
माझ्यासाठी रोज तू
एक फूल आणावं
तुझ्या भाषेत सांग ना
याला काय म्हणावं?
नवं घर नवा झरोका
कवडसा पडण्यासाठी
तुझं काळीज जुनी जागा
आठवणींना दडण्यासाठी...
अशीच तू हसत रहा
अधूनमधून दिसत रहा,
भरून आले डोळे तर
अश्रू माझे पुसत रहा.
तिनं दगा दिला म्हणून
मी नातं तोडून आलो
पण येताना तिच्याजवळ
माझं काळीज सोडून आलो...
सर्वांसोबत भांडलो मी
तिचा अपमान केल्यावरून...
पण, ती मात्र फिरत होती
दुसर्याचाच हात धरून.
नाही विसरू शकणार कधीच
तू भेटलीस ती जागा
कारण तूच माझं खरं प्रेम
तूच जगण्याचा धागा!
आपण कितीही हसलो तरी
दु:ख मनात साठतं
जवळचं कुणी भेटलं की
सारं सांगावं वाटतं.
प्रत्येक कळीला वाटतं
आपण सुद्धा फुलावं
आपलं सौंदर्य पाहून
कुणीतरी भुलावं!
कधी हसू कधी आसू
कधी दु:ख देते
रोज-रोज सये तुझी
मला आठवण येते.
कविता नाही लिहिली मी तर
लिहिली आहे व्यथा मनांची
हृदयामधल्या आठवणींची
विरहा मधल्या क्षणाक्षणांची.
आपण शेवटचं केव्हा भेटलो
अजून मला आठवत नाही
निरोप फक्त एवढाच मिळाला
आई कॉलेजला पाठवत नाही.
नेहमी तुझ्याशी भांडत राहतो
प्रेमाची भाषाच करत नाही
पण खरंच सये तुझ्याशिवाय
वेळ सरता सरत नाही.
तुझ्यात काही विशेष आहे
असे मला वाटत नाही
पण तुझ्याशिवाय दुसर्या मुलीकडे
बघणे सुद्धा पटत नाही.
मला अजून कळत नाही
तिच्या प्रेमाचा प्रकार
दोन दिवस होकार आणि
तिसर्या दिवशी नकार.
कुणीच घर बांधत नाही
सागराच्या काठावर
कारण... विश्वास नाही ठेवता येत
उसळणाऱ्या लाटांवर
कितीही दु:ख लपविलं तरी
डोळ्यातील पाणीच खरं वाटतं
मग दारात उभं राहण्यापेक्षा
पावसात भिजलेलं बरं वाटतं.
गर्दीचा फायदा तर
नेहमीच ती घ्यायची
माझ्याजवळ उभी राहून
हळूच धक्का द्यायची.
पावसाळ्यात प्रत्येक भेट
अचानक ठरायची
पाऊस पडू लागला की
ती मिठीत शिरायची.
वेणीमध्ये माळण्यासाठी ग
गुलाबाला खुडावं
अन् गुलाबानं अचानक
ओठांनाच भिडावं.
ढगांचा आवाज, सुसाट वारा
आभाळ यायचं भरून
बरसू लागायच्या सरीवर सरी
अन् ती पहायची दुरून...
मी थट्टा केल्यावर
खोटं-खोटंच चिडायची
प्रेमाची ही पद्धत तिची
काळजापर्यंत भिडायची...
आठवणींच्या सोबत आता
अवघड जिणं झालंय
तुझ्याशिवाय आयुष्यच
सुनं-सुनं झालंय.
मी फोन केला नाही
म्हणून ती चिडलेली
तिला ठाऊक नव्हतं...
मी जागून रात्र काढलेली.
तुझं माझं नातं जणू
हिरवीगार झाडी
नक्षीदार काठाची
मोरपंखी साडी.
आधी चोरून बघते
नंतर वही मागते
माझं मलाच कळत नाही
ती अशी का वागते?
केलाय आता निर्धार मी
नशिबाला घडवायचा
प्रयत्न करून बघ हवं तर
तू सुध्दा अडवायचा...
आजपर्यंत तुझ्यासारखं
कोणीच मला भेटलं नाही
म्हणूनच कोणावरती
प्रेम करावं वाटलं नाही.
देईल कशी ती माझ्या
हातामध्ये हात
मी आहे दिवस
ती आहे रात.
वेळ लागतो थोडातरी
मनातील भावना उमजायला
मग आपोआप सुरूवात होते
प्रेमाचा अर्थ समजायला.
स्वप्नामध्ये येते म्हणून
तिनं मला आतुर केलं
डोळा लागू नये म्हणून
झोपेलाही फितूर केलं.
तुटलेल्या ताऱ्याकडून
काही सुध्दा भेटत नाही
म्हणूनच त्याच्याजवळ
मागावंसं वाटत नाही.
कधी कधी आग सुद्धा
विझल्यासारखी वाटते
निखळ मैत्री प्रेमामध्ये
भिजल्यासारखी वाटते.
कॉलेजला सुट्टी
आठवणींची दाटी
मनामध्ये हुरहुर असते
तुझ्याच भेटीसाठी!
काळे ढग भरून आले
मन दाटल्यासारखे
पावसाचे थेंब पडू लागले
प्रेम वाटल्यासारखे.
नजरेलाही व्याकुळ करते
गालावरची खळी
मग दिवससुद्धा ढळू लागतो
तिन्हिसांजे वेळी!
होय, मी रस्ता चुकलोय..
पण ध्येयाशीच गाठ होईल
माझ्या पाऊल खुणांची
नवी पायवाट होईल.
धुक्यात शिरलो होतो
अंधारात फिरलो होतो
सोडून गेलीस तू तेव्हा
मी माझाच उरलो होतो.
भरकटलेल्या जिवाला
तू नवी दिशा दे
जग मुठीत करण्याची
एक नवी आशा दे...
वाऱ्याची झुळूक जेव्हा
गारवा देऊन जायची
खरं सांगतो तेव्हा मला
तुझी आठवण यायची.
प्रिये तुझं प्रेम म्हणजे
माझ्यासाठी भक्ती आहे
वादळाला आव्हान द्यायची
तुझ्या प्रेमात शक्ती आहे.
डोळे असतात जागण्यासाठी
डोळे असतात रडण्यासाठी
दु:खाची जाणीव असून देखील
तिच्या प्रेमात पडण्याची.
माझ्या काळजाची तार
तिनं प्रेमानं छेडली
गंधात बेधुंद होण्यापूर्वीच
नियतीनं कळी तोडली.
प्रेम आणि मैत्रीत
थोडं अंतर आहे
मैत्रीत दु:ख आधी
प्रेमात नंतर आहे.
एकटा कधी असतो मी
दु:खी कधी दिसतो मी
तिचा विचार करतो तेव्हा
माझ्याजवळ नसतो मी.
पहिल्या पावसाचा पहिला थेंब
बंद शिंपल्यात मोती होतो...
तिच्या आठवणीचा प्रत्येक क्षण
डोळ्यातून मोती उधळत जातो!
फुलासाठी गंध होता
कवीसाठी छंद होता
जीवनाच्या पेठाऱ्यात
मृत्यू जेरबंद होता.
आयुष्यभर भेटेल त्यानं
दिलेलं दु:ख पचवत आलोय
तुला वाटतंय रूसलोय मी...पण
मी तर भावनाशून्य झालोय.
काट्यांशी सलगी झाल्यापासून
फुलांचं कौतुकच वाटत नाही
कारण.... काट्यानं काटा काढणं
फुलांना कधीच पटत नाही.
ती गाडीवर बसली की
गाडी सुसाट धावायची
मनाला ओढ लागायची
हळूच ब्रेक लावायची!
सुंदर मुली गुलाबाच्या
फुलासारख्या दिसणारच
संरक्षणासाठी त्यांना
काटे देखील असणारच.
डोंगरावरून फिरताना
वाटतं कधी कधी
मी तुझा ‘सागर’ आणि
तू माझी ‘नदी’.
मन उदास झालं तरी
जगावंसं वाटतं मला
कारण माझ्यासाठी जग
असं सांगणारं भेटतं मला.
वारं माझ्या प्रेमात पडलंय
पानं नेहमी म्हणायची
त्याच वाऱ्याला बिलगून ती
गाणं नेहमी म्हणायची.
वचन देऊन भेटीचं
शब्द नाही पाळायचीस
वेड लावून प्रेमाचं
माझं काळीज जाळायचीस.
शब्द सगळेच विकतात
तिनं भावना विकली होती
त्याच क्षणी प्रेमाची
व्याख्या चुकली होती.
तिनं फूल आणलं पण
मला घेता आलं नाही
माझ्या हातात ते फूल
तिला देता आलं नाही.
रिमझिम पावसात ती
चिंब ओली झाली
चार शब्द प्रेमाचे
ओठी घेऊन आली.
डोळे बंद असले तरीही
समोर तिलाच बघत आहे
म्हणूनच तिच्याशिवाय
अजून जीवन जगत आहे.
अजूनही कंठ माझा
बघ दाटलेला नाही
कंठ दाटण्यासारखी
कुणी भेटलेली नाही.
पटलं नाही अजून मला
काळीज माझं तुटलंय
जिला भरवला घास प्रेमानं
तिनंच मला लुटलंय...
तुझी आठवण आली की
दुःख मनात दाटतं
तू दुसर्याची असताना...
का तुलाच पहावं वाटतं?
ती म्हणाली विसरून जा
माझ्यासाठी रडू नकोस
आणि रडणार असलास तर
पुन्हा प्रेमात पडू नकोस.
या देहावरची प्रत्येक जखम
तिनं ओल्या डोळ्यांनी पाहीली
पण तिनं दिलेली जखम मात्र
काळजावरच राहिली.
अर्ध्यात डाव मोडून गेलीस
तिथून मागे वळू नकोस
माझ्या मनाशी खेळलीस
आता दुसर्या कोणाशी खेळू नकोस.
खरं सांग तू कोणाच्या
प्रेमात पडली नाहीस का?
त्याच्या विरहात अख्खी रात्र
जागून रडली नाहीस का?
पहाटेची थंडी कशी
अंगाला बोचणारी
जशी तुझी आठवण
काळजापर्यंत टोचणारी.
तिनं मला प्रेम दिलं
अगदी भरभरून
मी मात्र उभा होतो
फाटकी झोळी धरून...
धरणीनं माणसाचं
उभं आयुष्य घडवलेलं
त्याच माणसानं धरणीला
पायदळी तुडवलेलं...
किती करावं प्रेम याचं
मला नव्हतं भान
नकाराची ठिणगी पडली
पेटून उठलं रान!
अंधार नेहमी साथ देतो
चांदनीला पेटायला
ती मात्र व्याकुळ असते
चंद्रालाच भेटायला...
नजरेचा खेळ सारा
नजरेलाच नडला
एक कटाक्ष चुकला
आणि प्रेम भंग घडला.
माझ्याजवळ वेळ नव्हता
नातं आपलं ठरवायला
वेळ काढून तूच यायचीस
मला घास भरवायला.
ज्या डोळ्यांनी प्रेम केलं
त्यांना भरून वहावं लागलं
तिनं वचन तोडलं म्हणून
एकटं जगत रहावं लागलं.
तुझ्या चुकांना विसरत राहिलो
वाटेवर काटेच पसरत राहिलो
तू दिलेल्या अश्रुंमध्ये
का वारंवार मी घसरत राहिलो.
पावसा सोबत गारा पडतात
काही क्षणात विरुन जातात
तू माझी झाली नाहीस
याचीच आठवण करून जातात.
प्रेमातील काही क्षण आठवतात आता
अडवणारेच भेटायला पाठवतात आता
आनंदाला दु:खाचे विरझन लावणारे
ओंजळीत अश्रुंना साठवतात आता.
तू माझी झाली नाहीस
हे फार बरं झालं
कारण.... तू सोडून गेल्यापासून
डोळ्यात पाणी नाही आलं.
रोज झोपण्यापूर्वी ती
‘Sweet Dream’ म्हणायची
स्वप्नामध्ये येताना
अश्रुच फक्त आणायची.
तुझं प्रेम डोळ्यातील
अश्रुंमध्ये साठवलंय
दगा देऊन तूच मला
माणसातून उठवलयं.
घाव देणारे खूप होते
फुंकर घालणारी तीच होती
तिनेच जाताना घाव दिले
खंत माझी हीच होती.
आठवण छळत होती म्हणून
तोल माझा सुटत होता
भावना अनावर होत होती
आणि आतून हुंदका फुटत होता.
तारे तुटले म्हणून कधीही
आकाश उणे होत नाही
प्रेमभंग झाला म्हणून
जीवन सुने होत नाही.
अश्रुंमध्ये वाहून गेले
डोळ्यातील भाव
तुझी आठवण करून देतात
काळजावरचे घाव...
आनंदाचे सारे क्षण
जिवापाड जपेन तुला
तू फक्त हो म्हण...
तुझ्या प्रितीचा लागे लळा...
केस विखुरले डोळ्यांवरती
दिसू लागली नाद खुळा...
मला रोज छळायची
तिची वाईट खोड
पण रागवणार कसा?
ती हसतेच खूप गोड.
ती म्हणाली सुखी रहा
मला घरचं बंधन आहे
पण तिच्या सुखासाठीच
माझं आयुष्य आंदण आहे.
पावसाची ओली सर
नेहमीचं गळकं घर
आधी मी ओंजळ धरतो
नंतर तू ओंजळ धर.
माझ्यासाठी रोज तू
एक फूल आणावं
तुझ्या भाषेत सांग ना
याला काय म्हणावं?
नवं घर नवा झरोका
कवडसा पडण्यासाठी
तुझं काळीज जुनी जागा
आठवणींना दडण्यासाठी...
अशीच तू हसत रहा
अधूनमधून दिसत रहा,
भरून आले डोळे तर
अश्रू माझे पुसत रहा.
तिनं दगा दिला म्हणून
मी नातं तोडून आलो
पण येताना तिच्याजवळ
माझं काळीज सोडून आलो...
सर्वांसोबत भांडलो मी
तिचा अपमान केल्यावरून...
पण, ती मात्र फिरत होती
दुसर्याचाच हात धरून.
नाही विसरू शकणार कधीच
तू भेटलीस ती जागा
कारण तूच माझं खरं प्रेम
तूच जगण्याचा धागा!
आपण कितीही हसलो तरी
दु:ख मनात साठतं
जवळचं कुणी भेटलं की
सारं सांगावं वाटतं.
प्रत्येक कळीला वाटतं
आपण सुद्धा फुलावं
आपलं सौंदर्य पाहून
कुणीतरी भुलावं!
कधी हसू कधी आसू
कधी दु:ख देते
रोज-रोज सये तुझी
मला आठवण येते.
कविता नाही लिहिली मी तर
लिहिली आहे व्यथा मनांची
हृदयामधल्या आठवणींची
विरहा मधल्या क्षणाक्षणांची.
आपण शेवटचं केव्हा भेटलो
अजून मला आठवत नाही
निरोप फक्त एवढाच मिळाला
आई कॉलेजला पाठवत नाही.
नेहमी तुझ्याशी भांडत राहतो
प्रेमाची भाषाच करत नाही
पण खरंच सये तुझ्याशिवाय
वेळ सरता सरत नाही.
तुझ्यात काही विशेष आहे
असे मला वाटत नाही
पण तुझ्याशिवाय दुसर्या मुलीकडे
बघणे सुद्धा पटत नाही.
मला अजून कळत नाही
तिच्या प्रेमाचा प्रकार
दोन दिवस होकार आणि
तिसर्या दिवशी नकार.
कुणीच घर बांधत नाही
सागराच्या काठावर
कारण... विश्वास नाही ठेवता येत
उसळणाऱ्या लाटांवर
कितीही दु:ख लपविलं तरी
डोळ्यातील पाणीच खरं वाटतं
मग दारात उभं राहण्यापेक्षा
पावसात भिजलेलं बरं वाटतं.
गर्दीचा फायदा तर
नेहमीच ती घ्यायची
माझ्याजवळ उभी राहून
हळूच धक्का द्यायची.
पावसाळ्यात प्रत्येक भेट
अचानक ठरायची
पाऊस पडू लागला की
ती मिठीत शिरायची.
वेणीमध्ये माळण्यासाठी ग
गुलाबाला खुडावं
अन् गुलाबानं अचानक
ओठांनाच भिडावं.
ढगांचा आवाज, सुसाट वारा
आभाळ यायचं भरून
बरसू लागायच्या सरीवर सरी
अन् ती पहायची दुरून...
मी थट्टा केल्यावर
खोटं-खोटंच चिडायची
प्रेमाची ही पद्धत तिची
काळजापर्यंत भिडायची...
आठवणींच्या सोबत आता
अवघड जिणं झालंय
तुझ्याशिवाय आयुष्यच
सुनं-सुनं झालंय.
मी फोन केला नाही
म्हणून ती चिडलेली
तिला ठाऊक नव्हतं...
मी जागून रात्र काढलेली.
तुझं माझं नातं जणू
हिरवीगार झाडी
नक्षीदार काठाची
मोरपंखी साडी.
आधी चोरून बघते
नंतर वही मागते
माझं मलाच कळत नाही
ती अशी का वागते?
केलाय आता निर्धार मी
नशिबाला घडवायचा
प्रयत्न करून बघ हवं तर
तू सुध्दा अडवायचा...
आजपर्यंत तुझ्यासारखं
कोणीच मला भेटलं नाही
म्हणूनच कोणावरती
प्रेम करावं वाटलं नाही.
देईल कशी ती माझ्या
हातामध्ये हात
मी आहे दिवस
ती आहे रात.
वेळ लागतो थोडातरी
मनातील भावना उमजायला
मग आपोआप सुरूवात होते
प्रेमाचा अर्थ समजायला.
स्वप्नामध्ये येते म्हणून
तिनं मला आतुर केलं
डोळा लागू नये म्हणून
झोपेलाही फितूर केलं.
तुटलेल्या ताऱ्याकडून
काही सुध्दा भेटत नाही
म्हणूनच त्याच्याजवळ
मागावंसं वाटत नाही.
कधी कधी आग सुद्धा
विझल्यासारखी वाटते
निखळ मैत्री प्रेमामध्ये
भिजल्यासारखी वाटते.
कॉलेजला सुट्टी
आठवणींची दाटी
मनामध्ये हुरहुर असते
तुझ्याच भेटीसाठी!
काळे ढग भरून आले
मन दाटल्यासारखे
पावसाचे थेंब पडू लागले
प्रेम वाटल्यासारखे.
नजरेलाही व्याकुळ करते
गालावरची खळी
मग दिवससुद्धा ढळू लागतो
तिन्हिसांजे वेळी!
होय, मी रस्ता चुकलोय..
पण ध्येयाशीच गाठ होईल
माझ्या पाऊल खुणांची
नवी पायवाट होईल.
धुक्यात शिरलो होतो
अंधारात फिरलो होतो
सोडून गेलीस तू तेव्हा
मी माझाच उरलो होतो.
भरकटलेल्या जिवाला
तू नवी दिशा दे
जग मुठीत करण्याची
एक नवी आशा दे...
वाऱ्याची झुळूक जेव्हा
गारवा देऊन जायची
खरं सांगतो तेव्हा मला
तुझी आठवण यायची.
प्रिये तुझं प्रेम म्हणजे
माझ्यासाठी भक्ती आहे
वादळाला आव्हान द्यायची
तुझ्या प्रेमात शक्ती आहे.
डोळे असतात जागण्यासाठी
डोळे असतात रडण्यासाठी
दु:खाची जाणीव असून देखील
तिच्या प्रेमात पडण्याची.
माझ्या काळजाची तार
तिनं प्रेमानं छेडली
गंधात बेधुंद होण्यापूर्वीच
नियतीनं कळी तोडली.
प्रेम आणि मैत्रीत
थोडं अंतर आहे
मैत्रीत दु:ख आधी
प्रेमात नंतर आहे.
एकटा कधी असतो मी
दु:खी कधी दिसतो मी
तिचा विचार करतो तेव्हा
माझ्याजवळ नसतो मी.
पहिल्या पावसाचा पहिला थेंब
बंद शिंपल्यात मोती होतो...
तिच्या आठवणीचा प्रत्येक क्षण
डोळ्यातून मोती उधळत जातो!
फुलासाठी गंध होता
कवीसाठी छंद होता
जीवनाच्या पेठाऱ्यात
मृत्यू जेरबंद होता.
आयुष्यभर भेटेल त्यानं
दिलेलं दु:ख पचवत आलोय
तुला वाटतंय रूसलोय मी...पण
मी तर भावनाशून्य झालोय.
काट्यांशी सलगी झाल्यापासून
फुलांचं कौतुकच वाटत नाही
कारण.... काट्यानं काटा काढणं
फुलांना कधीच पटत नाही.
ती गाडीवर बसली की
गाडी सुसाट धावायची
मनाला ओढ लागायची
हळूच ब्रेक लावायची!
सुंदर मुली गुलाबाच्या
फुलासारख्या दिसणारच
संरक्षणासाठी त्यांना
काटे देखील असणारच.
डोंगरावरून फिरताना
वाटतं कधी कधी
मी तुझा ‘सागर’ आणि
तू माझी ‘नदी’.
मन उदास झालं तरी
जगावंसं वाटतं मला
कारण माझ्यासाठी जग
असं सांगणारं भेटतं मला.
वारं माझ्या प्रेमात पडलंय
पानं नेहमी म्हणायची
त्याच वाऱ्याला बिलगून ती
गाणं नेहमी म्हणायची.
वचन देऊन भेटीचं
शब्द नाही पाळायचीस
वेड लावून प्रेमाचं
माझं काळीज जाळायचीस.
शब्द सगळेच विकतात
तिनं भावना विकली होती
त्याच क्षणी प्रेमाची
व्याख्या चुकली होती.
तिनं फूल आणलं पण
मला घेता आलं नाही
माझ्या हातात ते फूल
तिला देता आलं नाही.
रिमझिम पावसात ती
चिंब ओली झाली
चार शब्द प्रेमाचे
ओठी घेऊन आली.
डोळे बंद असले तरीही
समोर तिलाच बघत आहे
म्हणूनच तिच्याशिवाय
अजून जीवन जगत आहे.
अजूनही कंठ माझा
बघ दाटलेला नाही
कंठ दाटण्यासारखी
कुणी भेटलेली नाही.
पटलं नाही अजून मला
काळीज माझं तुटलंय
जिला भरवला घास प्रेमानं
तिनंच मला लुटलंय...
तुझी आठवण आली की
दुःख मनात दाटतं
तू दुसर्याची असताना...
का तुलाच पहावं वाटतं?
ती म्हणाली विसरून जा
माझ्यासाठी रडू नकोस
आणि रडणार असलास तर
पुन्हा प्रेमात पडू नकोस.
या देहावरची प्रत्येक जखम
तिनं ओल्या डोळ्यांनी पाहीली
पण तिनं दिलेली जखम मात्र
काळजावरच राहिली.
अर्ध्यात डाव मोडून गेलीस
तिथून मागे वळू नकोस
माझ्या मनाशी खेळलीस
आता दुसर्या कोणाशी खेळू नकोस.
खरं सांग तू कोणाच्या
प्रेमात पडली नाहीस का?
त्याच्या विरहात अख्खी रात्र
जागून रडली नाहीस का?
पहाटेची थंडी कशी
अंगाला बोचणारी
जशी तुझी आठवण
काळजापर्यंत टोचणारी.
तिनं मला प्रेम दिलं
अगदी भरभरून
मी मात्र उभा होतो
फाटकी झोळी धरून...
धरणीनं माणसाचं
उभं आयुष्य घडवलेलं
त्याच माणसानं धरणीला
पायदळी तुडवलेलं...
किती करावं प्रेम याचं
मला नव्हतं भान
नकाराची ठिणगी पडली
पेटून उठलं रान!
अंधार नेहमी साथ देतो
चांदनीला पेटायला
ती मात्र व्याकुळ असते
चंद्रालाच भेटायला...
नजरेचा खेळ सारा
नजरेलाच नडला
एक कटाक्ष चुकला
आणि प्रेम भंग घडला.
माझ्याजवळ वेळ नव्हता
नातं आपलं ठरवायला
वेळ काढून तूच यायचीस
मला घास भरवायला.
ज्या डोळ्यांनी प्रेम केलं
त्यांना भरून वहावं लागलं
तिनं वचन तोडलं म्हणून
एकटं जगत रहावं लागलं.
तुझ्या चुकांना विसरत राहिलो
वाटेवर काटेच पसरत राहिलो
तू दिलेल्या अश्रुंमध्ये
का वारंवार मी घसरत राहिलो.
पावसा सोबत गारा पडतात
काही क्षणात विरुन जातात
तू माझी झाली नाहीस
याचीच आठवण करून जातात.
प्रेमातील काही क्षण आठवतात आता
अडवणारेच भेटायला पाठवतात आता
आनंदाला दु:खाचे विरझन लावणारे
ओंजळीत अश्रुंना साठवतात आता.
तू माझी झाली नाहीस
हे फार बरं झालं
कारण.... तू सोडून गेल्यापासून
डोळ्यात पाणी नाही आलं.
रोज झोपण्यापूर्वी ती
‘Sweet Dream’ म्हणायची
स्वप्नामध्ये येताना
अश्रुच फक्त आणायची.
तुझं प्रेम डोळ्यातील
अश्रुंमध्ये साठवलंय
दगा देऊन तूच मला
माणसातून उठवलयं.
घाव देणारे खूप होते
फुंकर घालणारी तीच होती
तिनेच जाताना घाव दिले
खंत माझी हीच होती.
आठवण छळत होती म्हणून
तोल माझा सुटत होता
भावना अनावर होत होती
आणि आतून हुंदका फुटत होता.
तारे तुटले म्हणून कधीही
आकाश उणे होत नाही
प्रेमभंग झाला म्हणून
जीवन सुने होत नाही.
अश्रुंमध्ये वाहून गेले
डोळ्यातील भाव
तुझी आठवण करून देतात
काळजावरचे घाव...
हसणं आणि रडणं मी
केव्हाच सोडून दिलंय
जेव्हापासून तुझ्याशी
नातं जोडून दिलंय
कुणी तोडतं नातं
कुणी तोडतं मन
मी तुझ्या पायाखाली
काळीज तोडून दिलंय.
केव्हाच सोडून दिलंय
जेव्हापासून तुझ्याशी
नातं जोडून दिलंय
कुणी तोडतं नातं
कुणी तोडतं मन
मी तुझ्या पायाखाली
काळीज तोडून दिलंय.
डोळ्यात आलेले अश्रु
तिला आवरता आले नाही
ती रडली दुसर्यासाठी
म्हणून... सावरता आले नाही.
प्रिये तू अंधार दिलास
माझे काळीज जाळण्यासाठी
मी मात्र जळत राहिलो
तुला प्रकाश मिळण्यासाठी.
तिला आवरता आले नाही
ती रडली दुसर्यासाठी
म्हणून... सावरता आले नाही.
प्रिये तू अंधार दिलास
माझे काळीज जाळण्यासाठी
मी मात्र जळत राहिलो
तुला प्रकाश मिळण्यासाठी.
नजरेला टाळू नकोस
काळजामध्ये उतरशील
काळजाला जाळू नकोस
नजरेतून उतरशील.
काळजामध्ये उतरशील
काळजाला जाळू नकोस
नजरेतून उतरशील.
माझं सारं आयुष्य
तुझ्या चरणी वाहीलंय
तू जाळून पाहीलंस तरीही
प्रेम शिल्लक राहीलंय.
तुझ्या चरणी वाहीलंय
तू जाळून पाहीलंस तरीही
प्रेम शिल्लक राहीलंय.
प्रिये तुझे केस जेव्हा
चेहऱ्यावरती झुकतात
माझ्या वेड्या काळजामध्ये
ठोके हळूच चुकतात
- कवी : शरद तानाजीराव पाटील
मु.पो.दुशेरे, ता.कराड, जि.सातारा
मो.नं- ९७६३०१५५३०
0 टिप्पण्या